मुंबई: पालकांनो सावधान! प्रतिष्ठित शाळेत अ‍ॅडमिशन देण्याच्या नावाखाली मोठी फसवणूक... ट्रॅफिक हवालदार निलंबित!

मुंबई तक

मुंबईत शाळा आणि कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ADVERTISEMENT

शाळेत अॅडमिशन देण्याच्या नावाखाली मोठी फसवणूक...
शाळेत अॅडमिशन देण्याच्या नावाखाली मोठी फसवणूक...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रतिष्ठित शाळेत अ‍ॅडमिशन देण्याच्या नावाखाली मोठी फसवणूक...

point

सहभागी आरोपी ट्रॅफिक हवालदार निलंबित!

point

मुंबईतील धक्कादायक प्रकरण

Mumbai Crime: मुंबईत शाळा आणि कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधी एका संघटित फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. बीकेसी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दोन लोकांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपी हे पालकांना त्यांच्या मुलांचं कोणत्या तरी प्रतिष्ठित शाळा किंवा कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवून देण्याचं आमिष दाखवत होते आणि या बदल्यात ते लोकांकडून अवाढव्य फीची मागणी करायचे. याप्रकरणी बऱ्याच पालकांची तक्रार मिळाल्यानंतर, पोलिसांची या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार, हे रॅकेट बऱ्याच काळापासून सक्रीय असून कित्येकांना यात अडकवलं गेल्याचं समोर आलं आहे. 

ट्रॅफिक कॉन्स्टेबलविरुद्ध FIR दाखल   

पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी महफूज जकी अहमद शेख उर्फ राजेश कोटवानी याला मागील आठवड्यातच अटक केल्याची माहिती आहे. तपासादरम्यान, या जाळ्यात शेख एकटा आरोपी नसून त्यामध्ये सरकारी डेटा पुरवण्यात एका वाहतूक हवालदार म्हणजेच ट्रॅफिक कॉन्स्टेबलचाही सहभाग असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी अमोल दत्तात्रय अवघडे या ट्रॅफिक कॉन्स्टेबलविरुद्ध FIR दाखल करण्यात आली आणि त्याचा गुन्हा समोर आल्यानंतर विभागाकडून त्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. या दोन्ही आरोपींवर फसवणूक आणि विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही वाचा: पुण्यात मौजमजा करायला पैसे पुरेनात, बी.टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांना सोबत घेऊन स्वत:च्या घरातच टाकला दरोडा

गाड्यांच्या नंबर प्लेट्सच्या माध्यमातून माहिती... 

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी राजेश कोटवानी अतिशय चलाखीने पालकांना आपल्या जाळ्यात ओढायचा. तो शाळा आणि कॉलेजच्या बाहेर पार्क केलेल्या गाड्यांच्या नंबर प्लेट्सचे फोटो काढायचा. त्याच्या आधारे, तो मुलांच्या संभाव्य पालकांना टार्गेट करायचा. त्यानंतर, तो हे फोटो थेट कॉन्स्टेबल अवघडे यांना पाठवायचा. या नंबर प्लेट्सच्या आधारे, आपल्या मुलांसाठी कोणते पालक अॅडमिशनच्या शोधत आहेत? याचा शोध घेतला जायचा आणि नंतर त्यांना फोन करून प्रतिष्ठित शाळा आणि कॉलेजात अॅडमिशन मिळवून देण्याचं आमिष दाखवायचे. 

प्रतिष्ठित शाळेत अॅडमिशन मिळवून देण्याचं आमिष 

कॉन्स्टेबल अवघडे आरोपी शेखला संबंधित वाहनाच्या मालकांची संपूर्ण माहिती उपलब्ध करुन द्यायचा. तो वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ई-चलान मशीनद्वारे सरकारी डेटाबेस मिळवायचा. सरकारी यंत्रणेचा हा गैरवापर या प्रकरणातील अतिशय गंभीर गुन्हा मानला जात आहे. माहिती मिळाल्यानंतर, आरोपी मुलांच्या पालकांशी संपर्क साधायचा आणि काही स्पेशल कनेक्शनच्या माध्यमातून अॅडमिशन मिळवून देणार असल्याचं खोटं सांगायचा. अशा पद्धतीने, आरोपीने बऱ्याच लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp