सनीच अतिक अन् अशरफच्या हत्येचा मास्टरमाईंड! कोर्ट ते हॉस्पिटल केला होता प्लॅन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sunny is the mastermind of Atiq-Ashraf murder. He was the one who framed Lovelesh Tiwari and another accused
Sunny is the mastermind of Atiq-Ashraf murder. He was the one who framed Lovelesh Tiwari and another accused
social share
google news

अतिक अहमद (Atiq Ahmad) आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येत आतापर्यंत 3 आरोपींचाच सहभाग असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. अद्यापपर्यंत कोणतीही चौथी व्यक्ती किंवा कोणत्याही गँगचे नाव समोर आलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनीला दिल्लीतील गोगी गँगने जिगाना पिस्तूल दिले होते. दिल्ली एनसीआरमधील न्यायालयाच्या आवारात एका गुंडाला मारण्याचे काम सनीला देण्यात आले होते, ते पूर्ण झाले नाही. त्यानंतर त्याने ती पिस्तूल स्वतःकडेच होती. (Sunny is the mastermind of Atiq-Ashraf murder. He was the one who framed Lovelesh Tiwari and another accused)

ADVERTISEMENT

सनीच अतिक अन् अशरफच्या हत्येचा मास्टरमाईंड :

सनी हा अतिक-अशरफ हत्याकांडाचा मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानेच लवलेश तिवारी आणि अन्य एका आरोपीला तयार केले होते. प्रयागराजमध्ये 15 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:30 वाजता पहिला शूटर लवलेश तिवारी हॉटेलमधून निघून गेला आणि त्यानंतर सनी आणि तिसरा शूटर निघाला. तिन्ही शूटर क्षणोक्षणी अतिक आणि अशरफच्या बातम्यांवर लक्ष ठेवून होते.

Amritpal Singh : चकमा देणाऱ्या अमृतपालच्या हातात अखेर बेड्या, कसं पकडलं?

अतिक आणि अशरफला रुग्णालयातच मारण्याचा होता प्लॅन :

आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी अतिक आणि अशरफ यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याचवेळी तिन्ही शूटर्स कोर्टात उपस्थित होते. तिथेच दोघांनाही मारण्याचा प्लॅन होता. मात्र गर्दी आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे हल्ल्याची योजना पुढे ढकलली. त्यानंतर त्याच दिवशी अतिक आणि अशरफला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान तिन्ही हल्लेखोरांनी पुन्हा रेकी केली आणि हॉस्पिटलमध्येच हल्ल्याचा प्लॅन आखला.

हे वाचलं का?

सॅनिटरी पॅडच्या आड दारुची तस्करी, लाखो रुपयांच्या बिअरचा साठा जप्त

15 एप्रिलच्या 2 दिवस आधी, म्हणजेच 13 एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता तिन्ही शुटर्सनी हॉटेलमध्ये चेक इन केले होते. तिघेही हॉटेलमधील रूम नंबर-203 मध्ये थांबले होते. तिघेही रेकी करण्यासाठी इथून निघायचे. आपल्या प्लॅनचा कोणाला सुगावा लागू नये म्हणून तिघेही एकत्र न जाता एक एक करून हॉटेल सोडत असत.

13 एप्रिलच्या संध्याकाळपासून तिन्ही शूटर अतिक आणि अशरफचा पाठलाग करत होते. 13 आणि 14 एप्रिलला तिघांनीही अतिक-अशरफच्या वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस कधी निघतात, परत कधी जातात, याची माहिती गोळा केली होती. त्यानंतर 15 एप्रिलला शूटर ई-रिक्षातून हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि संधी मिळताच त्यांनी दोघांना गोळ्या घातल्या. पण जर 15 एप्रिलला आपण गोळ्या घालू शकलो नसतो तर 16 किंवा 17 ला एप्रिलला पुन्हा एकदा टार्गेट करण्याचे नियोजन तिन्ही शुटर्सनी केले होते.

ADVERTISEMENT

मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, भोजपुरी अभिनेत्रीला रंगेहाथ अटक

या खून प्रकरणाचा एसआयटी वेगाने तपास करत आहे. एसआयटीने हॉटेलमध्ये लपलेले 2 मोबाईल फोन आणि एक चार्जर जप्त केला आहे. पण, मोबाईलमध्ये सिम सापडलेले नाही. हॉटेलच्या खोलीतून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये एसआयटीला काही जुने नंबरही सापडले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT