Baba Siddique : बाबा सिद्दीकी हत्याकांडात मोठी अपडेट! पोलिसांना 'त्या' बॅगेत काय सापडलं?

दिव्येश सिंह

Baba Siddique Case Update : बाबा सिद्दीकी यांची ज्या ठिकाणी हत्या झाली होती. त्या ठिकाणापासून 250 मीटर अंतरावर पोलिसांना ही बॅग सापडली आहे. या बॅगेत पोलिसांना एक स्लिप सापडली आहे. ही स्लिप बाईक खरेदीची होती. ही बाईक त्यांना या घटनेतील सातवा आरोपी असलेल्या हरिश निशादने घेऊन दिल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

बाबा सिद्दीकी हत्याकांडात मोठी अपडेट!
baba siddique case update bag found 250 meters away from the crime scene what was in the bag read full artical
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पोलिसांना घटनास्थळी बॅग सापडली

point

बॅगेतून पोलिसांच्या हाती ढीगभर पुरावे लागलेत

point

आरोपी देश सोडून जाण्याच्या तयारीत होते

Baba Siddique Case Update : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांना घटनास्थळापासून 250 मीटर अंतरावर एक बॅग सापडली आहे. या बॅगेतून पोलिसांच्या हाती ढीगभर पुरावे हाती लागले आहे. त्यामुळे या बॅगेतून पोलिसांना काय काय सापडलं आहे? हे जाणून घेऊयात. (baba siddique case update bag found 250 meters away from the crime scene what was in the bag read full artical) 

बाबा सिद्दीकी यांची ज्या ठिकाणी हत्या झाली होती. त्या ठिकाणापासून 250 मीटर अंतरावर पोलिसांना ही बॅग सापडली आहे. या बॅगेत पोलिसांना एक स्लिप सापडली आहे. ही स्लिप बाईक खरेदीची होती. ही बाईक त्यांना या घटनेतील सातवा आरोपी असलेल्या हरिश निशादने घेऊन दिल्याची माहिती समोर आली आहे. 

निशादने बाईक खरेदीसाठी लोणकर बंधूकडून  60 हजार रूपयांची मागणी केली होती. पण लोणकर बंधूंनी त्यांना पुण्यातून 32 हजारात जुनी बाईक खरेदी करून दिली होती, अशी माहिती आता तपासातून समोर आली आहे. याच बाईकचा वापर शुटर बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि ऑफिसची रेकी करण्यासाठी करत होते. तसेच घटनेच्या काही दिवस अगोदर ते बाईकवरून पडले देखील होती. त्यामुळे त्या दिवशी त्यांनी बाईक न वापरता ऑटोरिक्षाने घटनास्थळी पोहोचून रेकी केली होती,अशी माहिती आता समोर आली आहे. तसेच शुटरने तब्बल 45 मिनिटे बाबा सिद्दीकींची वाट पाहिली होती. या दरम्यान शूटर बंगल्याची आणि घराची रेकी करत होते,अशी माहिती उघडकीस आली आहे. 

हे ही वाचा : Baba Siddique : बाबा सिद्दीकींनंतर 'हा' अभिनेता बिश्नोई गँगच्या टार्गेटवर?

या बॅगेत एक तुर्की बनावटीचे 7.62 एमएम पिस्तूल सापडली आहे. ही पिस्तुल शिवा उर्फ शिवकुमारची असण्याची दाट शक्यता आहे. कारण शिवा सोबत असलेले धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंह यांना पोलिसांनी घटनास्थळी अटक केली होती. त्यामुळे त्यांच्या हातातल्या बंदूका पोलिसांनी त्याचवेळी ताब्यात घेतल्या होत्या. त्यात शिवकुमार हा पसार होण्यास यशस्वी ठरला होता. त्यामुळे बँगेत ठेवलेली बंदूक ही त्यांचीच असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्याचसोबत ही बँग शिवाने पळताना इतक्या दुरवर फेकल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp