बारामतीत 2 महिलांची निर्घुण हत्या कशामुळे? प्राथमिक तपासातून मोठा खुलासा
Baramati double murder case : बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे दोन वृद्ध महिलांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. घराचे कपाट उघडे आणि काही दागिने चोरीला गेल्याने चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बारामतीत दोन महिलांची गळा चिरुन संपवलं
आता हत्येचं प्राथमिक कारण समोर!
Baramati double murder case, वसंत मोरे : बारामती तालुक्यातील शेरेवाडी गावात दोन वृद्ध महिलांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या अंगणात खाटांवर झोपलेल्या दोन्ही महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेत कृष्णाबाई कुंडलिक लडकत (वय 63) आणि इंदुमती मारुती लडकत (वय 75) यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. या दुहेरी हत्याकांडामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा : 'ती' फेसबुक पोस्ट अन् श्रुती मराठे विद्याधर जोशींवर चांगलीच भडकली; म्हणाली, "घरात बसून.."
अंगणात खाटांवर झोपलेल्या असताना धारदार शस्त्राने हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला एकमेकींच्या चुलत सासू-सुना होत्या. इंदुमती लडकत यांना मधुमेहाचा त्रास असल्याने दोघी एकत्र झोपत होत्या. सोमवारी मध्यरात्री दोघी घराच्या अंगणात खाटांवर झोपलेल्या असताना त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी दोघींचा गळा चिरला. इंदुमती लडकत या बाबुर्डी गावच्या माजी सरपंच होत्या. दोन्ही महिलांच्या हत्येमुळे शेरेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा : कॉकरोच जनता पार्टीला शिवाजी पार्कवर आंदोलन करण्याची परवानगी का नाकारली?
