Crime: घरात शिरला आणि गळा घोटला…, महिला अधिकाऱ्याला ड्रायव्हरनेच का संपवलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

bengaluru murder kanataka women officer killed by former driver shocking crime story
bengaluru murder kanataka women officer killed by former driver shocking crime story
social share
google news

Bengluru Murder : बंगळुरुतून (Bengluru) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याची (women officer) तिच्याच राहत्या घरी निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. महिला अधिकाऱ्याच्या हत्येपुर्वी तिने खाण माफियांविरोधात कारवाई केली होती. या कारवाईचा बदला म्हणून तिची खाण माफियांनी हत्या केल्याचा पोलिसांना दाट संशय होता. मात्र या घटनेत आता वेगळाच खुलासा झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका ड्रायव्हरला (Driver) अटक केली आहे. हा व्यक्ती महिलेचा जुना ड्रायव्हर होता. त्याने नेमकी महिला अधिकाऱ्याची हत्या का केली? हे जाणून घेऊयात. (bengaluru murder kanataka women officer killed by former driver shocking crime story)

दक्षिण बंगळुरु भागातील महिला अधिकाऱ्याच्या राहत्या घरी तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी घडली होती. प्रथिमा केएस असे या 45 वर्षीय महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रथिमाने शनिवारी रात्री तिच्या छोट्या भावाला फोन केला होता. त्यानंतर पहाटे छोट्या भावाने रविवारी पहाटे प्रथिमाला फोन केला. पण प्रथिमाचा फोन बंद येत होता. त्यानंतर काळजीपोटी भावाने घर गाठलं असता तिची हत्या झाल्याची घटना समोर आली. प्रथिमाच्या पतीचे नाव सुर्यनारायण आहे,ते शिवमोग्गाच्या तिर्थहल्ली परीसरात राहतात. या दोघांना एक 16 वर्षांचा मुलगा देखील आहे.

हे ही वाचा : Angelo Mathews ने लगेच घेतला Time Out चा बदला! शाकिबला…; पाहा व्हिडिओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रविवारी सकाळी 8.30 च्या दरम्यान सुब्रमण्यपुरा पोलिसांनी डोड्डाकल्लासंद्रा येथून प्रथिमा यांचा मृतदेह ताब्यात घेतला होता. प्रथिमा यांची हत्या त्यांच्याच राहत्या घरात करण्यात आली होती. प्रथिमाचा आधी गळा घोटण्यात आला, त्यानंतर चाकूने वार करून तिचा गळा कापून निर्घृण हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोस्टमार्टम रिपोटचा अहवालाची आता पोलिसांना प्रतिक्षा आहे. विशेष म्हणजे, घरात कोणत्याच प्रकारची घुसखोरी केल्याचे पुरावे नाहीत. तसेच घरातील कोणतीच मौल्यवाण वस्तुही गायब नाही आहे. त्यामुळे प्रथिमा यांची हत्या त्यांच्याच ओळखीच्या व्यक्तीने केल्याचा पोलिसांनी संशय होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

प्रथिमाने खाण माफियांविरोधात कारवाई केल्याने त्यांची हत्या याच माफियांनी केली असावी असा पोलिसांना संशय होता.मात्र या घटनेचा कसून तपास केला असता, पोलिसांनी या प्रकरणात एका ड्रायव्हरला अटक केली आहे. या ड्रायव्हरने ही हत्येची कबुली दिली आहे. या आरोपी ड्रायव्हरने नाव किरण आहे. प्रथिमाने किरणला कॉन्ट्रक्टवर नोकरी दिली होती. आरोपी महिलेचा ड्रायव्हर होता. यानंतर किरणला नोकरीवरून काढण्यात आले होते. आणि त्याच्या जागी एका दुसऱ्या ड्रायव्हरला नोकरी देण्यात आली होती. या घटनेने किरण नाराज होता. या नाराजीतून त्याने प्रथिमा याची हत्या केली होती. या घटनेचा उलगडा झाल्यानंतर एकच खळबळ माजली आहे.

हे ही वाचा : Shiv Sena : उद्धव ठाकरेंना म्हणाले ‘लुटारू’, उदय सामंतांचा व्यंगचित्रातून वार

    follow whatsapp

    ADVERTISEMENT