पाच वर्षांच्या चिमुरडीसमोर आईसोबत घडलं नको तेच! पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

मुंबई तक

एका पाच वर्षांच्या चिमुरडीसमोर तिच्या आईची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या त्या चिमुरडीच्या सावत्र बापानेच केली. वैशालीमध्ये घडलेली ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पाच वर्षांच्या चिमुरडीसमोर आईसोबत घडलं नको तेच!

point

पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Crime News : एका गावात निष्पाप चिमुकलीच्या डोळ्यांसमोर तिच्या आईची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल अडीच वर्षांपूर्वी मोठ्या आशेने बांधलेली संसाराची गाठ शेवटी अत्यंत वेदनादायक वळणावर सुटली. अवघ्या 22 वर्षांच्या आशा देवी या तरुणीचा तिच्या दुसऱ्या पतीने, सुजीत पासवान याने, काठीने बेदम मारहाण करून जीव घेतला. संसाराची मोडलेली स्वप्ने आणि कौटुंबिक वादाचा भयंकर अंत एका निरागस मुलीच्या आयुष्यावर कायमचा आघात करून गेला. घटनेनंतर आरोपी पतीने आपल्या कुटुंबासह पळ काढला, तर मृतदेहाजवळ अनाथ झालेली पाच वर्षांची चिमुरडी एकटीच हुंदके देत बसली होती. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील ही घटना आहे.

पाच दिवस उपाशी अन् नंतर हत्या

आशा आणि सुजीत या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. पहिल्या पतीच्या निधनानंतर आशा आपल्या पाच वर्षांच्या मुलीसह सुजीतच्या आयुष्यात आली होती, तर सुजीतचीही पहिली पत्नी आजाराने मरण पावली होती. सुरुवातीचे सहा महिने सर्व काही सुरळीत चालले होते, मात्र त्यानंतर सुजीतचे वर्तन अचानक बदलले. सुजीतचे त्याच्या पहिल्या सासरच्या लोकांशी पुन्हा संपर्क वाढले आणि तिथूनच घरात वादाची ठिणगी पडली. मुलांच्या संगोपनावरून आणि जुन्या नात्यांवरून घरात वारंवार खटके उडू लागले. या वादातूनच आशा हिला गेल्या पाच दिवसांपासून उपाशी ठेवण्यात आले होते आणि अखेर रविवारी (4 ऑक्टोबर) तिला काठीने बेदम मारहाण केली.

हे ही वाचा : MPSC आंदोलनाबाबत हायकोर्टातून मोठी अपडेट, न्यायालयाचं विद्यार्थ्यांना आवाहन, सरकारला निर्देश

'मला हे जिवंत सोडणार नाहीत...'

हत्येच्या काही वेळ आधी, म्हणजेच रविवारी रात्री 9 च्या सुमारास, मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या आशाने आपल्या माहेरी फोन केला होता. "मला इथून घेऊन जा, नाहीतर हे लोक मला जिवंत सोडणार नाहीत," अशी आर्त हाक तिने आपल्या आई-वडिलांना दिली होती. मात्र, रात्रीच्या वेळी असमर्थता दर्शवत माहेरच्या लोकांनी सकाळी यायचे ठरवले आणि तीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. रात्री सासू-सासरे घरात नसताना सुजीतने काठीने मारहाण करून आशाचा खून केला आणि संपूर्ण कुटुंबासह घरातून पळ काढला. सकाळी शेजाऱ्यांचा फोन आला तेव्हा माहेरच्या पायाखालची जमीनच सरकली.

हे ही वाचा : तपासणीच्या नावाखाली डॉक्टरचा महिलेच्या प्रायव्हेट पार्टला चुकीचा स्पर्श, पोलिसांकडून अटक

चिमुरडीचा जबाब, आरोपी फरार

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. चिमुरडीने दिलेल्या जबानीनुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आपल्याच पोटच्या मुलीसमोर तिच्या आईचा असा क्रूर अंत झाल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सध्या पोलीस फरार आरोपी सुजीत आणि त्याच्या कुटुंबीयांचा कसून शोध घेत असून या नराधमाला लवकरच बेड्या ठोकल्या जातील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.