लग्नाआधी नवरीने ठोकली धूम, नवरदेवाचा 13 दिवस मंडपात मुक्काम, नंतर बॉयफ्रेंडकडून…

मुंबई तक

ADVERTISEMENT

bride ran away with boyfriend before wedding ceremony husband protest
bride ran away with boyfriend before wedding ceremony husband protest
social share
google news

Bride ran away with boyfriend before wedding ceremony : देशभरात लग्नसराई सुरू आहे. अनेक तरूण-तरूणी लग्नबंधनात अडकतायत. जागोजागी ढोल-नगाडे वाजतायत. या सर्वात आता एका लग्नाची विचित्रच घटना समोर आली आहे. या घटनेत एका भर लग्नमंडपातून (Wedding) नवरीने (Bride) पळ काढल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर तब्बल 13 दिवस नवऱ्याने (Groom) सासरीच ठिय्या मांडला. या दरम्यान त्याने डोक्यावरचा फेटा देखील काढला नव्हता. त्यामुळे सासरच्या मंडळींना तिचा शोध घेऊन मंडपात तिचे लग्न लावावे लागले होते. (bride ran away with boyfriend before wedding ceremony husband protest)

ADVERTISEMENT

राजस्थानच्या पाली जिल्ह्याच्या बाली उपखंडात ही घटना घडली आहे. या घटनेत सैना गावच्या सकाराम यांच्या मुलीचे लग्न सिरोही जिल्ह्याच्या मणादर गावातील श्रवण कुमारशी ठरलं होते. ठरल्यानुसार दोन्ही कुटुंबियांची संपूर्ण तयारी झाली होती. नवरा श्रवण कुमार 3 मे ला सेना गावात त्याच्या लग्नाची वरात घेऊन पोहोचला होता. यावेळी नवरीकडच्यांनी त्याचे खुप जल्लोषात स्वागत केले होते. यानंतर 4 मेच्या पहाटे सकाळी 6.15 वाजता लग्नाचे फेरे होते. यासाठी पंडित यांनी नवरी मुलीला मंडपात बोलावले होते. मात्र नवरी मुलीची तब्येत खराब असल्याने थोडा उशीर होण्याचे कारण सांगितले होते.

हे ही वाचा : Crime: सपासप.. चाकूचे 40 वार नंतर दगडाने केला 16 वर्षाच्या गर्लफ्रेंडचा चेंदामेंदा

नवरी मुलीचे पलायन

इकडे मंडपात नवरा वाट पाहत असताना पोटदुखी आणि उलट्या होण्याचा बहाना करत नवरी मुलगी मागच्या दरावाजाने पळाली होती. मागच्या दरवाज्यात तिचा चुलत भाऊ उभा होता, त्याच्यासोबत तिने पळ काढला होता. दरम्यान खुप वेळ होऊन देखील नवरी मुलगी परत न आल्याने कुटूंबियांना ती पळून गेल्याचा संशय बळावला होता.नवरीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा लग्नाच्या फेऱ्यापुर्वी तयार व्हायला गेली होती. या दरम्यान तिने पोटदुखीचा बहाना करून ती बाथरूमला गेली. यावेळी घराच्या मागे मामा शिवलालचा मुलगा भरतकुमार आधीच उपस्थित होता. त्याने मुलीला पळून नेले होते.

हे वाचलं का?

या घटनेची माहिती नवऱ्याकडच्यांना मिळताच त्यांना धक्काच बसला. या घटनेनंतर नातेवाईक घरी जायला निघाले होते. मात्र नवरा मुलगा लग्न करण्यावर ठाम होता. त्यामुळे त्याने लग्नमंडपातच ठिय्या मांडला होता. अगदी डोक्यावरचा फेटा देखील उतरवला नाही आणि लग्नमंडपातच त्याने 13 दिवस ठिय्या आंदोलन केले होते. या दरम्यान लग्न मंडप देखील उतरवण्यात आला नव्हता.

हे ही वाचा : ‘तुझ्या अंगातील भूत काढायचं असेल, तर सेक्स…’, बहिणीच्या नवऱ्यानेच 8 महिने केला रेप

गुजरातमध्ये सापडली नवरी

नवऱ्याच्या हट्टानंतर सासरच्यांनी नवरीचा शोध सुरु केला होता. स्वत:च्याच नातेवाईकासोबत नवरीच्या पलायनाने तिचा शोध घेणे थोडे सोप्पे होते. अखेर नवरी मुलीचा पत्ता सापडल्यानंतर तिला गुजरात वरून घरी आणण्यात आले आहे. त्यानंतर आंदोलनावर बसलेल्या नवऱ्यासोबत 16 मे रोजी लग्न लावण्यात आले होते. या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT