Crime : अंगावर काटा आणणारं हत्याकांड; आई अन् भाऊ-बहिणीने मिळून काढला काटा

मुंबई तक

ADVERTISEMENT

A sensational incident of a mother killing her daughter has taken place in Mathura, Uttar Pradesh.
A sensational incident of a mother killing her daughter has taken place in Mathura, Uttar Pradesh.
social share
google news

Crime news in marathi : आईनेच दोन मुले आणि एका मुलीला हाताशी मिळून दुसऱ्या मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये घडली आहे. यशोदा शर्मा असे तरुणीचे नाव आहे. अर्धनग्न अवस्थेत एका तलावात या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलीस तपासात हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. (A sensational incident of a mother killing her daughter has taken place in Mathura, Uttar Pradesh.)

ADVERTISEMENT

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोदाच्या चुकीच्या वागण्याचा आणि सवयींचा तिच्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांना त्रास होत होता. काही दिवसांपूर्वी ती सासरहून निघून माहेरी आली होती. ती परत गेलीच नव्हती. आईने याबाबत मुलीला अनेकदा समजावून सांगण्याच प्रयत्न केला. पण ऐकत नसल्याने आईने मुलीला मारण्याचा कट रचला.

हेही वाचा : पुण्यात क्रूर कांड, अनेक पुरुषांशी अनैतिक संबंध? दिराने पळवून आणलं अन् नंतर वहिनीलाच…

आईने एकादशीपूर्वी आपल्या मोठ्या मुलीला आपल्या घरी बोलावले आणि यशोदेला मारण्याचा कट रचला. यानुसार चौघांनी शनिवारी रात्री यशोदेला बोलण्याच्या बहाण्याने बोलावून गोविंद कुंडात नेऊन गळा आवळून तिची हत्या केली, हात-पाय बांधून मृतदेह तलावात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी मृतदेह दिसून आल्यानंतर गावातील लोकांनी पोलिसांना माहिती दिली.

हे वाचलं का?

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. मृतदेहाच्या तोंडात बोळा होता. तसंच पाण्यामुळे चेहरा कुजला होता. त्यामुळे सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचण येत होती. मात्र मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला. यात तिचा बुडून नाही तर गळा दाबल्याने श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले.

हेही वाचा : विकृतीचा कळस! अंध महिलेवर पतीसमोरच लैंगिक अत्याचार

त्यानंतर तपासात हा मृतदेह यशोदा शर्माचा असल्याचं समोर आलं. यशोदाला अडीच वर्षांचा एक मुलगाही आहे. मथुराचे एसएसपी शैलेश कुमार पांडे यांनी सांगितले की, 2 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन गोवर्धन परिसरात सापडलेला मृतदेह यशोदाचा आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कसून तपासात महिलेची हत्या दोन सख्ख्या भाऊ, बहीण आणि आईने मिळून केल्याचे समोर आले. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT