बायको रिक्षा चालवायची, इंस्टाग्रामवर मित्रांशी बोलायची; संतापलेल्या नवऱ्याने...

मुंबई तक

चेन्नईतील एका व्यक्तीने आपली पत्नी देवकी हिचा गळा दाबून खून केला. पोलिसांच्या माहितीनुसार, इंस्टाग्राम आणि रिक्षा चालवण्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला होता. या हत्येनंतर पोलिसांनी आरोपी चिन्ना याला अटक केली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बायको रिक्षा चालवायची

point

इंस्टाग्रामवर मित्रांशी बोलायची

point

संतापलेल्या नवऱ्याने...

Crime News : चेन्नईतील अंबत्तूर परिसरात 24 वर्षांच्या देवकी नावाच्या महिलेची तिच्या पतीनेच गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंस्टाग्रामवर पुरुष मित्रांशी होणारे संभाषण आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून होणारे वाद यातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपी पती चिन्ना याने हे कृत्य केले असून, घटनेच्या अवघ्या काही तासांतच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

रिक्षा चालवायला नवऱ्याचा विरोध

देवकी ही पती चिन्ना आणि तीन मुलांसह (दोन मुली व एक मुलगा) चेन्नईतील इंदिरा नगर भागात राहत होती. देवकी स्वतः ऑटो-रिक्षा चालवायला शिकत होती, या गोष्टीला चिन्नाचा विरोध होता. तसेच तिच्या इंस्टाग्राम वापरावरून चिन्ना तिच्यावर सतत संशय घेत होता. या वादानंतर देवकी तिच्या माहेरी थिरुमुल्लैवोयल येथे निघून गेली होती. मंगळवारी रात्री चिन्नाने तिथे जाऊन मुलांच्या सांगण्यावरून वाद मिटवण्याचे नाटक केले आणि तिला परत घरी आणले.

हे ही वाचा : काल आमदार झाले आज थेट मारण्याची भाषा.. कर्डिले हे बरं नव्हं..

सुऱ्याने चिरला गळा

घरी पोहोचल्यानंतर काही वेळ गप्पा मारल्यावर चिन्नाने देवकीला ऑटो चालवण्यास सांगितले आणि तो स्वतः मागे बसला. ऑटो एका निर्जन रस्त्यावर पोहोचताच चिन्नाने लपवून ठेवलेला सुरा काढून देवकीचा गळा चिरला. गंभीर जखमी झालेली देवकी रस्त्यावर कोसळली आणि प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पती तिथून फरार झाला.

हे ही वाचा : Personal Finance: मुंबईत स्वत:च घर घेऊन EMI भरावा की Rent वर राहून SIP करावी?

दारु पिताना पोलिसांच्या ताब्यात

रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी माहिती दिल्यानंतर पुदुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ऑटोच्या नोंदणी क्रमांकावरून तपास करत पोलिसांनी मध्यरात्री कामराजपुरम परिसरातून चिन्नाला ताब्यात घेतले, जिथे तो मित्रांसोबत दारू पित होता. चौकशीदरम्यान चिन्नाने संशयातूनच पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली असून, पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.