Crime News : “छगन भुजबळांना मारायची सुपारी मिळालीये, उद्या संपवणार”
शरद पवारांची साथ सोडल्यावरून छगन भुजबळ टीकेचे धनी ठरताना दिसत आहे. अशातच भुजबळांना एका व्यक्तीने थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली.
ADVERTISEMENT
Maharashtra Crime News : अजित पवारांनी बंड केले. त्यांच्या गटातील एक नेते आहेत छगन भुजबळ. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला. छगन भुजबळांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नावही समोर आलं असून, या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. (Chhagan Bhujbal Gets death threat call)
ADVERTISEMENT
अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. शरद पवारांची साथ सोडल्यावरून छगन भुजबळ टीकेचे धनी ठरताना दिसत आहे. अशातच भुजबळांना एका व्यक्तीने थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली.
‘भुजबळांना उद्या संपवणार’, नेमकं प्रकरण काय?
कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या गायकवाड नावाच्या व्यक्तीला आरोपीने कॉल केला. कॉलवरून आरोपीने आधी छगन भुजबळांच्या कार्यालयात फोन लागला का अशी विचारणा केली. नंतर त्यांनी मारण्याची सुपारी मिळाल्याचे सांगितले आणि उद्या त्यांना संपवणार आहोत, अशी धमकी दिली.
हे वाचलं का?
वाचा >> MLA: सत्तेत सहभागी झाले तरी नरहरी झिरवळ म्हणाले, ‘शिवसेनेचे आमदार अपात्र होणार!’
आरोपीने कॉल करून “त्यांना मारायची सुपारी मिळालीये मला. प्रशांत पाटील बोलतोय. त्यांना मारायची सुपारी मिळालीये. त्यांना मी उद्या मारणार. आपण सांगून काम करतो म्हणून तुम्हाला सांगितलं. काय केलं, ते साहेबांना माहीत. आपण, सांगून काम करतो म्हणून कॉल केला”, अशी धमकी दिली.
भुजबळांना धमकी देणारा आरोपी कोण?
दरम्यान, या प्रकरणी पुणे पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भुजबळांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रशांत पाटील आहे. प्रशांत पाटील हा मूळचा कोल्हापूरचा असून, त्याने महाड येथून कॉल करून धमकी दिली होती.
ADVERTISEMENT
वाचा >> ‘देवेंद्र फडणवीस नागपूरला कलंक’, उद्धव ठाकरेंनी ऑडिओ क्लिपच लावली!
पुणे गुन्हे शाखा पोलिसांनी प्रशांत पाटील याला महाड येथून अटक केली. दुसरीकडे या धमकीनंतर पुण्यातील सर्कीट हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आरोपीने भुजबळ यांच्या मुंबईतील कार्यालयात कॉल करून धमकी दिली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT