सैन्य दलातील हेड कॉन्स्टेबलने सहकारी जवानाच्या मुलीचे केले लैंगिक शोषण, अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुंबई तक

Crime News : किशनगंजमध्ये एसएसबी 19 बटालियन येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील ठाकूरगंज पोलीस ठाणे परिसरातील हद्दीतील एका हेड कॉन्स्टेबलवर स्वत:च्यात बटालियनमधील एका सैनिकाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

सैन्यादलातील सहकाऱ्याच्या मुलीवर लैंगिक शोषण

point

हेड कॉन्सेबलच्या आवळल्या मुसक्या 

Crime News : बिहारच्या सिमावर्ती जिल्हा असलेल्या किशनगंजमध्ये एसएसबी 19 बटालियन येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील ठाकूरगंज पोलीस ठाणे परिसरातील हद्दीतील एका हेड कॉन्स्टेबलवर स्वत:च्यात बटालियनमधील एका सैनिकाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर बटालियन परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात तणाव आणि संतापाची लाट पसरली आहे. 

हे ही वाचा : शोक खरातनंतर नाशिकमधून आणखी एक अश्लील व्हिडिओ स्कँडल, पेनड्राइव्हमध्ये 121 अश्लील क्लिप्स

सैन्यादलातील सहकाऱ्याच्या मुलीवर लैंगिक शोषण

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी, हेड कॉन्स्टेबर मनचंदा पवार आणि पीडितेचे वडील एकाच बटालियनमध्ये काम करतात. शनिवारी सायंकाळी संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच, आरोपीने आपल्याच सैन्य दलातील सहकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीशी घृणास्पद कृत्य केले. या घटनेनंतर आरोपी तात्काळपणे घटनास्थळावरून पळ काढला, या हैवानी कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पीडितेच्या वडिलांनी आपल्या सहकाऱ्याच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोप करत गुन्हा दाखल केला. 

हेड कॉन्सेबलच्या आवळल्या मुसक्या 

या प्रकरणाची माहिती समोर येताच, ठाकूरगंज पोलिसांनी तात्काळपणे कारवाई करत आरोपी हेड कॉन्सेबलला अटक केली. एसडीएपीओ मंगलेश कुमार सिंह यांनी अटकेला दुजोरा देत सांगितलं की, पोलिसांनी तात्काळपणे कारवाई करत आरोपीला ताब्यात घेत, पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. 

हे ही वाचा : शेतात नेऊन अल्पवयीन मुलीच्या तोंडात फडकं कोंबलं, चौघांकडून सामुहिक बलात्कार, अश्लील व्हिडीओही बनवला

एसडीपीओ यांनी सांगितलं की, प्रकरणाचे गांभीर्य ओळखत सर्व कायदेशीर प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केल्या आहेत. आरोपीला न्यायालयीन कोठडी होणार आहे. पीडितेला न्याय मिळून आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, यासाठी पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.  
 

हे वाचलं का?