टँकर ड्रायव्हरसोबत प्रेम फुललं, 6 महिने लिव्ह-इनमध्ये अन् शेवटी..भयंकर घडलं!
Crime News : लिव-इन पार्टनरची गळा आवळून हत्या; इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीचे रूपांतर गुन्ह्यात झाले...टँकर ड्रायव्हरच्या प्रेमात पडणे तरुणीला महागात पडले,
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
टँकर ड्रायव्हरसोबत प्रेम फुललं
6 महिने लिव्ह-इनमध्ये अन् शेवटी..भयंकर घडलं!
Crime News : लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीची तिच्या 27 वर्षीय प्रियकराने गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शरथ असे आरोपीचे नाव असून तो शहरात पाण्याच्या टँकरचा चालक म्हणून काम करत होता. मल्लेश्वरम परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून हे दोघेही भाड्याच्या घरात एकत्र राहत होते. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा : 'गदारीचा शिक्का लावून...', ओमराजे निंबाळकरांनी 'तो' व्हिडीओ शेअर करताच कमेंट्सचा पाऊस
अनुषाचा गळा आवळून जीव घेतला
मिळालेल्या माहितीनुसार, अनुषा आणि शरथ या दोघांची ओळख इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. दोघेही हासन जिल्ह्यातील सकलेशपूर येथील रहिवासी होते. ओळखीचे रूपांतर लवकरच मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले, ज्यानंतर त्यांनी बेंगळुरू गाठले आणि मल्लेश्वरम भागात एकत्र राहण्यास सुरुवात केली. शनिवारी रात्री दोघांमध्ये कोणत्याही कारणावरून शाब्दिक वाद झाला, जो हळूहळू विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. रागाच्या भरात शरथने अनुषाचा गळा आवळून तिचा जीव घेतला.
हेही वाचा : महाराष्ट्रात आजच फोडाफोडी होणार, आधी शिंदेंसोबत बैठक, अन् मग फुटलेले खासदार...









