दिव्यांग लेकीवर वडिलांकडून लैंगिक शोषणाचा आरोप, तरुणी गरोदर राहिल्यानं प्रकरण उघडकीस, आईनं पोलीस ठाणे गाठलं...
Crime news : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नराधम बापानेच आपल्या मुलीचे लैंगिक शोषण केले. पीडित मुलगी ही दिव्यांग होती अशी माहिती समोर आली. वडिलांच्या अशा कृत्यानंतर मुलगी गरोदर राहिल्याचे उघड झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दिव्यांग तरुणीवर वडिलांकडून लैंगिक शोषणाचा आरोप
नराधम बापाला न्यायालयीन कोठडी
Crime News : ओडिशात बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. नराधम बापानेच आपल्या मुलीचे लैंगिक शोषण केले. पीडित मुलगी ही दिव्यांग होती अशी माहिती समोर आली. वडिलांच्या अशा कृत्यानंतर मुलगी गरोदर राहिल्याचे उघड झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे.
हे ही वाचा : अशोक खरातचा सीडीआर कोणाकडून मिळाला? विरोधकांच्या आरोपांनंतर अंजली दमानियांचा खुलासा, डोळे पाणावले!
दिव्यांग तरुणीवर वडिलांकडून लैंगिक शोषणाचा आरोप
संबंधित प्रकरण हे ओडिशाचील ढेंकनाल जिल्ह्यातील रसोळ पोलीस ठाणे हद्दीतील आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या एका दिव्यांग मुलीवर वडिलांनी तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप आहे. मुलीच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचा गैरफायदा घेत हा गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित तरुणीच्या शरीरात बदल जाणवू लागले असता, तिच्या कुटुंबीयांना भलताच संशय आला. वैद्यकीय तपासणीतून तरुणी गर्भवती राहिल्याचे निष्पन्न झाले. तिला ढेंकनाल जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल केले, जिथे तिने एका मुलीला जन्म देखील दिला.
नराधम बापाला न्यायालयीन कोठडी
लेकीची अवस्था पाहून आई पूर्णपणे खचून गेली, या घटनेनं परिसरात एकच धक्का बसला असून तिने स्वत: पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास केला. या प्रकरणी नराधम बापाला न्यायालयीन कोठडी सुनावली. संबंधित प्रकरणात पोलिसांनी पुढील तपासणी सुरु ठेवली आहे.









