पडक्या घरात नेऊन 6 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, 70 वर्षीय निवृत्त शिक्षकाचे कृत्य; गावकऱ्यांची मागणी काय?

मुंबई तक

एका रिटायर्ट शिक्षकाने सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

पडक्या घरात नेऊन 6 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

point

70 वर्षीय निवृत्त शिक्षकाचे कृत्य

point

गावकऱ्यांची मागणी काय?

Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उत्तर प्रदेशातील बरेली परिसरात उघडकीस आली आहे. एका 70 वर्षीय निवृत्त शिक्षकाने नातीच्या वयाच्या अवघ्या सहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जयदेव नावाच्या या नराधम आरोपीने चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुरडीला आपल्या जाळ्यात ओढले आणि एका पडक्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल

अत्याचार केल्यानंतर आरोपीने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे घाबरलेल्या चिमुरडीने घरात काहीच सांगितले नाही. मात्र, या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ परिसरात वाऱ्यासारखा पसरला आणि मुलीच्या कुटुंबापर्यंत पोहोचला. जेव्हा पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली, तेव्हा तिने रडत रडत तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. एका सुशिक्षित आणि शिक्षक राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे कृत्य केल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे.

हे ही वाचा : शेतात नेऊन अल्पवयीन मुलीच्या तोंडात फडकं कोंबलं, चौघांकडून सामुहिक बलात्कार, अश्लील व्हिडीओही बनवला

आरोपीच्या भावाने दिली धमकी

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. धक्कादायक बाब म्हणजे, या कृत्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपीचा भाऊ मुन्नू याने पीडित कुटुंबाला धमकावण्यास सुरुवात केली होती. व्हिडिओ डिलीट करण्यासाठी त्याने कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुख्य आरोपी जयदेव आणि त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.

हे ही वाचा : अवैध प्रेमसंबंधाला नवऱ्याचा विरोध, बायकोने पतीचे गुप्तांग छाटलं, हादरवून टाकणारा घटनेचा थरार

गावकऱ्यांची मागणी काय?

पोलीस ठाण्याचे प्रभारी रवींद्र कुमार यांनी सांगितले की, 'आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुख्य आरोपी सध्या गजाआड असून त्याचा भाऊ मुन्नू, ज्याने पीडित कुटुंबाला धमकावले होते, तो सध्या फरार आहे. पोलीस पथक त्याचा कसून शोध घेत असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल.' या घटनेने बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी गावकरी करत आहेत.

हे वाचलं का?