बौद्ध भिक्खुणीच्या हत्येने खळबळ, मृतदेहावर आढळले अनेक पुरुषांचे डीएनए; अल्पवयीन मुलासह आतापर्यंत चौघांना अटक

मुंबई तक

एका वृद्ध बौद्ध भिक्षुणीच्या हत्येनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे. तिच्या शरीरावर चार पुरुषांचे डीएनए आढळून आले आहेत. गेल्या एक महिन्यांपासून आरोपींचा शोध घेणाऱ्या पोलिसांना अखेर यश मिळाले आहे. हादरवून टाकणारं हे हत्याकांड कसं घडलं, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

बौद्ध भिक्षुणीच्या हत्येने खळबळ

point

मृतदेहावर आढळले अनेक पुरुषांचे डीएनए

point

अल्पवयीन मुलासह आतापर्यंत चौघांना अटक

Crime News : पवित्र बौद्ध लेण्यांमध्ये राहणाऱ्या एका 80 वर्षीय वृद्ध बौद्ध भिक्षुणीची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांसह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. 2 मार्च रोजी ही हत्या झाली होती. लूटमार करण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मृत महिला ही मूळ तिबेटी वंशाची असून तिच्या घरी दूध द्यायला येणाऱ्या व्यक्तीनेच त्याच्या साथीदारांसोबत मिळून ही हत्या केली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सरकीधार य्थील पवित्र लेण्यामध्ये ही वृद्ध महिला रहायची. मन:शांती आणि आयुष्याचा खरा अर्थ उमगावा यासाठी अनेकजण या लेण्यांना भेट देतात. काहीजण तिथं राहतातसुद्धा.

चारपेक्षा अधिक पुरुषांचे डीएनए

या प्रकरणाच्या तपासात फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या अहवालाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मृतदेहावरून मिळालेल्या नमुन्यांमध्ये चारपेक्षा अधिक पुरुषांचे डीएनए आढळल्याने, ही हत्या एका व्यक्तीने नसून एका टोळीने केल्याचे स्पष्ट झाले. या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली असून, अटक करण्यात आलेल्या सर्व चार आरोपींचे डीएनए नमुने आता पुढील तपासासाठी घेण्यात आले आहेत.

हे ही वाचा : अवैध प्रेमसंबंधाला नवऱ्याचा विरोध, बायकोने पतीचे गुप्तांग छाटलं, हादरवून टाकणारा घटनेचा थरार

आधी नशा केली अन् नंतर हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी गगन बौद्ध याला भिक्षुणीच्या दिनचर्येबद्दल सविस्तर माहिती होती. घटनेच्या रात्री 2 मार्च रोजी, आरोपींनी घटनास्थळापासून काही अंतरावर नशा केली आणि रात्री 9 च्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला करून भिक्षुणीची हत्या केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी आरोपींनी मुख्य रस्त्यांऐवजी ग्रामीण भागातील पळवाटांचा वापर केला होता. या प्रकरणात गुरुवारी (2 मार्च) रात्री तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, बल्ह खोऱ्यातील एका अल्पवयीन मुलाचाही यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

हे वाचलं का?