16 वर्षीय मुलगी बाळाला जन्म देणार की गर्भपात होणार? न्यायालय घेणार निर्णय, सावत्र बापाने केला होता बलात्कार

मुंबई तक

सावत्र बापाने त्याच्याच मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती आहे. ती या बाळाला जन्म देणार की तिचा गर्भपात होणार याचा निर्णय आता न्यायालयात होणार आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

16 वर्षीय मुलगी बाळाला जन्म देणार की गर्भपात होणार?

point

न्यायालय घेणार निर्णय

point

सावत्र बापाने केला होता बलात्कार

Crime News : पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळ करण्याऐवजी एका नराधम सावत्र पित्याने आपल्याच 16 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अत्याचारामुळे ही अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिली असून, आता ती आई होणार की तिचा गर्भपात केला जाणार, याचा निर्णय न्यायालय घेणार आहे. झारखंडमधील मूळ रहिवासी असलेली पीडितेची आई आपल्या पहिल्या पतीला सोडून आरोपीसोबत उत्तराखंडमध्ये एका गावात राहायला आली होती. मात्र, ज्याच्यावर विश्वास ठेवून तिने संसार थाटला, त्यानेच तिच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले.

सावत्र पित्यानेच केला अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, घराचा गाडा चालवण्यासाठी पीडितेची आई आपल्या लहान मुलांसह कामासाठी उत्तराखंडला गेली होती. यावेळी घरात एकट्या असलेल्या मुलीवर सावत्र पित्याने वारंवार बलात्कार केला. आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या मुलीने ही बाब कोणालाही सांगितली नाही. मात्र, काही काळानंतर तिच्या शरीरात बदल होऊ लागले आणि सतत पोटात दुखू लागले. सुरुवातीला औषधोपचार करून वेळ मारून नेली, परंतु 31 मार्च रोजी वेदना असह्य झाल्याने आईने तिला डॉक्टरांकडे नेले, तेव्हा ती गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासात निष्पन्न झाले.

हे ही वाचा : हैवानाने महिलेवर लैंगिक अत्याचार केला, नंतर गुप्तांगात बाटली घालून दगडाने डोकं ठेचलं, क्रूरतेची परिसिमा ओलांडली

सावत्र बापाच्या बाळाला जन्म देणार की नाही?

या धक्कादायक खुलाशानंतर पीडितेच्या आईने 1 एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत नराधम सावत्र पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून सध्या तो तुरुंगात आहे. आरोपी तुरुंगात गेला असला तरी पीडित मुलीची ओढाताण थांबलेली नाही. 16 वर्षांच्या कोवळ्या वयात स्वतःच्या सावत्र बापाच्या बाळाला जन्म द्यायचा की नाही, या विवंचनेत ही मुलगी अडकली आहे. सामाजिक आणि मानसिक परिणामांचा विचार करून आईने आता न्यायाचे दार ठोठावले आहे.

हे ही वाचा : नाशिक हादरले! दिंडोरीत भीषण अपघात, कार विहिरीत कोसळून 6 मुलांसह 9 जणांचा दुर्दैवी अंत

गर्भपातासाठी न्यायालात याचिका

पीडितेच्या आईने मुलीचा गर्भपात करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कायद्यानुसार ठराविक काळानंतर गर्भपात करण्यासाठी न्यायालयाची संमती आवश्यक असते, त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पीडितेच्या आईने न्यायालयात केलेल्या अर्जाबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही, असे पोलीस निरीक्षक प्रमेंद्र यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
 

हे वाचलं का?