बॉयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
Crime News : तीन-चार वर्षांच्या जुन्या प्रेमसंबंधाला कुटुंबांचीही संमती होती. मात्र, एका संशयातून झालेल्या वादानंतर परमप्रीत सिंहचा कारखाली आल्याने मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बॉयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला
अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
Crime News : रायपूरमध्ये जुन्या प्रेमसंबंधातून झालेल्या वादानंतर एका तरुणाचा मृत्यू झाला. प्रेयसीला थांबवण्यासाठी कारच्या बोनटवर चढलेल्या तरुणाला कारने सुमारे 200 मीटरपर्यंत फरफटत नेले आणि त्यानंतर तो रस्त्यावर पडला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कार त्याच्या अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रायपूरमधील आमानाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
हेही वाचा : Maharashtra Weather : पावसाचा वेग मंदावला, मान्सून गायब होण्याची शक्यता?
मृत तरुणाचे नाव परमप्रीत सिंह असून तो टाटीबंध येथील उदया सोसायटीत राहत होता. तो व्यावसायिक होता. परमप्रीत आणि संबंधित तरुणी एकमेकांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून ओळखत होते. दोन्ही कुटुंबांमध्ये त्यांच्या लग्नाबाबतही चर्चा झाली होती. मात्र, एका भेटीतून निर्माण झालेला संशय आणि त्यानंतर झालेल्या वादामुळे परिस्थिती गंभीर बनली.
परमप्रीतने आपल्या प्रेयसीला तिचा मित्र भरत मंगनानी याच्यासोबत पाहिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. सुरुवातीला परमप्रीत आणि तरुणीमध्ये त्याच्या कारमध्येच वादावादी झाली. त्यानंतर तरुणी भरतसोबत जाण्यास निघाली. परमप्रीतने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. वाद वाढल्यानंतर परमप्रीतने भरतच्या कारला धडक दिली. त्यानंतर भरतने कार पुढे नेली. मात्र, परमप्रीत मागे हटला नाही आणि कारच्या बोनटवर चढला. कार थांबेल, अशी त्याची अपेक्षा असावी; मात्र कार थांबली नाही.
