हनिमूनसाठी गेलेल्या नवविवाहिता आगीत होरपळली, दोन महिने मृत्यूशी झुंज अपयशी
Crime News : लग्नानंतर हनिमूनसाठी दार्जिलिंगला गेलेल्या एका नवविवाहित तरुणीचा बार्बेक्यूच्या आगीत गंभीररित्या भाजून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. निकिता साहा असे या नवविवाहितेचे नाव असून, तब्बल दोन महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गुरुवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हनिमूनसाठी गेलेल्या नवविवाहिता आगीत होरपळली
दोन महिने मृत्यूशी झुंज अपयशी
Crime News : लग्नानंतर हनिमूनसाठी दार्जिलिंगला गेलेल्या एका नवविवाहित तरुणीचा बार्बेक्यूच्या आगीत गंभीररित्या भाजून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. निकिता साहा असे या नवविवाहितेचे नाव असून, तब्बल दोन महिने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गुरुवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नवविवाहित जोडप्याच्या संसाराची स्वप्ने सुरू होण्यापूर्वीच उद्ध्वस्त झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा : लग्नाचे आमिष दाखवून 14 महिलांची फसवणूक, शारीरिक अन् आर्थिक शोषण..
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, चोप्रा येथील रहिवासी असलेले समीर दास आणि निकिता यांचा विवाह काही महिन्यांपूर्वीच झाला होता. लग्नानंतर हे जोडपे मधुचंद्रासाठी दार्जिलिंग जिल्ह्यातील सिटोंग येथील एका खाजगी होमस्टे (रिसॉर्ट) मध्ये मुक्कामासाठी आले होते. १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी होमस्टेमध्ये बार्बेक्यू सुरू असताना अचानक आगीचा भडका उडाला आणि ही आग निकिताच्या शरीरापर्यंत पसरली.
दोन महिन्यांची झुंज अपयशी
आग लागताच होमस्टेचे कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत निकिता गंभीररित्या भाजली होती. तिला तातडीने सिलीगुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने पुढील उपचारांसाठी तिला कोलकाता येथे हलवण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यांपासून तिच्यावर उपचार सुरू होते, परंतु प्रकृती खालावत गेल्याने गुरुवारी तिचा मृत्यू झाला.
होमस्टे व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचे आरोप
या दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पती समीर दास यांनी होमस्टे व्यवस्थापनावर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. बार्बेक्यू ग्रिलच्या अगदी जवळ तेलाचा ड्रम ठेवण्यात आला होता, ज्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचा दावा त्यांनी केला आहे. दुसरीकडे, होमस्टे मालकाने हे आरोप फेटाळून लावत, ही आग होमस्टेचा कर्मचारी नसलेल्या एका अज्ञात व्यक्तीमुळे लागल्याचा दावा केला आहे. दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत.
हे ही वाचा : धाराशिव : प्रेमप्रकरणातून नात्याचा रक्तरंजित शेवट, पतीची निर्घृणपणे हत्या
दरम्यान, या घटनेने पर्यटन स्थळांवरील खाजगी रिसॉर्ट्स आणि होमस्टेमध्ये बार्बेक्यूसारखे उपक्रम राबवताना अग्निशमन उपकरणे, ज्वलनशील पदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती महत्त्वाची आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
