लग्नाचे आमिष दाखवून 14 महिलांची फसवणूक, शारीरिक अन् आर्थिक शोषण..

Crime News : लग्नाचे खोटे आमिष दाखवून तब्बल 14 महिलांची फसवणूक आणि शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण करणाऱ्या फरार आरोपीला संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) भारतात आणण्यात यश आले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लग्नाचे खोटे आमिष दाखवून तब्बल 14 महिलांची फसवणूक

point

फरार आरोपीला संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) भारतात आणण्यात यश

Crime News : लग्नाचे खोटे आमिष दाखवून तब्बल 14 महिलांची फसवणूक आणि शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण करणाऱ्या फरार आरोपीला संयुक्त अरब अमिरातीमधून (UAE) भारतात आणण्यात यश आले आहे. मोहम्मद माझिन असे या आरोपीचे नाव असून, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI), परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांतून शुक्रवारी (दि. 20 नोव्हेंबर) त्याचे यशस्वी प्रत्यार्पण करण्यात आले.

हे ही वाचा : धाराशिव : प्रेमप्रकरणातून नात्याचा रक्तरंजित शेवट, पतीची निर्घृणपणे हत्या

काय आहे नेमके प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद माझिन हा एका फसवणूक व शोषण प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांना हवा होता. त्याने लग्नाची खोटी आश्वासने देऊन एका महिलेला जाळ्यात ओढले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिचे शारीरिक, मानसिक तसेच आर्थिक शोषण केले.

पोलीस तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली असून, माझिनने अशाच प्रकारे लग्नाचे आमिष दाखवून इतर 13 महिलांचीही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. तो या महिलांकडून पैसे उकळायचा आणि त्यांच्यासोबतच्या जवळीकीचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवायचा, असा गंभीर आरोप त्याच्यावर आहे.

इंटरपोलची 'रेड नोटीस' आणि अटक

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी परदेशात पसार झाला होता. महाराष्ट्र पोलिसांच्या विनंतीवरून सीबीआयच्या दिल्लीस्थित कार्यालयाने इंटरपोलच्या माध्यमातून माझिनविरुद्ध 'रेड नोटीस' जारी केली होती. त्यानंतर तो युएईमध्ये लपून बसल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक युएई अधिकाऱ्यांनी त्याला अटक केल्यानंतर, तेथील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला भारतात परत पाठवण्यास मंजुरी देण्यात आली.

कोची विमानतळावर आणले भारतात

आरोपीचा ताबा घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे एक विशेष पथक युएईमध्ये रवाना झाले होते. युएई प्रशासनाने कायदेशीर सोपस्कार पूर्ण करत माझिनला भारतीय पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलीस पथक आरोपीला घेऊन विमानाने रवाना झाले आणि 20 नोव्हेंबर रोजी कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर (कोची) दाखल झाले.

हे ही वाचा : सेंटर पॉईंट : भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा धक्का, वचपा काढला?

इंटरपोलद्वारे 300 हून अधिक गुन्हेगारांचे प्रत्यार्पण

दरम्यान, सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 2019 पासून इंटरपोलच्या माध्यमातून परदेशात पळून गेलेल्या 300 हून अधिक पाहिजे असलेल्या गुन्हेगारांना भारतात परत आणण्यात यश आले आहे. यापैकी 2026 पर्यंत 200 गुन्हेगारांचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे.