दोन बॉयफ्रेंड, तरुणी झाली प्रेग्नंट, बाळाचा बाप कोण? DNA चाचणीतून होणार खुलासा

मुंबई तक

Crime News kanpur : कानपूरच्या घाटमपूरमध्ये दोन तरुणांशी संबंध असलेल्या 25 वर्षीय तरुणीचा आंब्याच्या बागेत मृतदेह आढळला. पोस्टमार्टममध्ये ती सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले असून, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

दोन बॉयफ्रेंड, तरुणी झाली प्रेग्नंट

point

बाळाचा बाप कोण? DNA चाचणीतून होणार खुलासा

Crime News kanpur : कानपूरच्या घाटमपूरमध्ये एका 25 वर्षीय तरुणीचा आंब्याच्या बागेत मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. या तरुणीचे दोन तरुणांशी संबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. दोघांपैकी एकाने तिच्याशी लग्न करून जबाबदारी घ्यावी, अशी मागणी ती करत होती. मात्र, दोन्ही तरुणांनी जबाबदारी घेण्यापासून कथितपणे टाळाटाळ केली. दरम्यान, तरुणीची गर्भावस्था पुढे जात होती आणि गावातही याबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. काही काळानंतर ती अचानक घरातून गायब झाली. कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला, मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर एका आंब्याच्या बागेत तिचा मृतदेह आढळला.

हेही वाचा : नाशिक : रस्ता आहे की घसरगुंडी? प्रवास करणे जीवघेणे, VIDEO पाहाच

पोस्टमार्टम अहवालात तरुणी 7 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर

मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून पोस्टमार्टम केले. पोस्टमार्टम अहवालात तरुणी सुमारे सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. मात्र, तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे पोस्टमार्टम अहवालातून स्पष्ट होऊ शकले नाही. घाटमपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी योगेश सिंह यांच्या माहितीनुसार, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी Viscera सुरक्षित ठेवण्यात आला आहे. त्याची तपासणी झाल्यानंतर मृत्यूच्या कारणाबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या पोलिसांसमोर तरुणीचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. यासोबतच तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळाचा पिता कोण होता, हा दुसरा प्रश्नही पोलिसांसमोर आहे.

हेही वाचा : आधी दगडाने ठेचून हत्या नंतर शेतात पुरले मृतदेह, आरोपीला पाहून पोलीसही चक्रावले