पोलीस स्टेशनकडे तक्रार देण्यासाठी निघाली, वाटेत तरुणीच्या मानेवर मित्राकडून ब्लेडने वार
Crime News : इंदूरमध्ये किरकोळ वादातून पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघालेल्या महिलेवर ब्लेडने हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःलाही जखमी केले; वाहतूक पोलिसांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पोलीस स्टेशनकडे तक्रार देण्यासाठी निघाली
वाटेत तरुणीच्या मानेवर मित्राकडून ब्लेडने वार
Crime News : इंदूरमध्ये एका व्यक्तीने किरकोळ वादातून आपल्या मैत्रिणीच्या मानेवर ब्लेडने वार केल्याची घटना घडली. महिला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःच्या मानेवरही ब्लेडने वार करून स्वतःला जखमी केले. दोघांनाही रस्ते वाहतूक पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले असून, दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : 'शर्करावगुंठित'.., विद्यानंद बापटांनी पेटऱ्यातून नवा शब्द काढला, अर्थ आहे तरी काय?
ब्लेडने महिलेच्या मानेवर वार
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आणि त्या व्यक्तीमध्ये एका मुद्द्यावरून वाद झाला होता. या वादानंतर महिलेने महिला पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. ती तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्याकडे जात असताना त्या व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला. त्याने ब्लेडने महिलेच्या मानेवर वार केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. रक्तबंबाळ अवस्थेत ती मदतीसाठी रस्त्यावर आली.
हेही वाचा : वेदर रिपोर्ट : मराठवाड्याला दिलासा मिळणार? कोणत्या तारखांना मुसळधार पाऊस?
