नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह; डोक्यावर खोलवर जखमा, पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर
Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठ येथील कॅन्ट परिसरात नग्न अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेनं संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृत महिलेच्या डोक्यावर मोठ मोठ्या खोलवर जखमा दिसत आहेत. या खुणांमुळे महिलेवर बलात्कार केल्याचा संशय उपस्थित केला जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कॅन्ट परिसरात नग्न अवस्थेत एका महिलेचा मृतदेह

मृतदेहाच्या डोक्यात खोलवर जखमा, नेमकं काय घडलं?
Crime News : उत्तर प्रदेशातील मेरठ येथील कॅन्ट परिसरात नग्न अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेनं संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मृत महिलेच्या डोक्यावर मोठ मोठ्या खोलवर जखमा दिसत आहेत. या खुणांमुळे महिलेवर बलात्कार केल्याचा संशय उपस्थित केला जात आहे. गंभीर परिस्थिती पाहता पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. दरम्यान, या घटनेचा खुलासा व्हावा यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली जात आहे.
हेही वाचा : बॉयफ्रेंडनं महिलेला OYO हॉटेलमध्ये नेऊन चाकूनं केले 17 वार, कारण ऐकूण हादरून जाल
नेमकं प्रकरण काय?
मेरठच्या कॅन्ट परिसरातील एका कंपनीच्या उद्यानासमोर महिलेचा मृतदेह होता. स्थानिकांना या ठिकाणाहून दुर्गंधीचा सामना करावा लागतो. यानंतर तपासात एका महिलेचा विवस्त्र मृतदेह आढळला. संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी असलेला मृतदेह झाकण्यात आला. आणि अशावेळी फॉरेन्सिक पथकाला त्या ठिकाणी बोलावण्यात आले. या मृतदेहाची अवस्था पाहून ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यानंतर हा मृतदेह पथकाने ताब्यात घेतला आहे.
तपासादरम्यान, मृतदेहाच्या ठिकाणी असलेल्या काही वस्तू पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. ज्यामध्ये चप्पल, लॅपटॉप बॅग आणि काही कपडे सापडले आहेत, या वस्तूंचा वापर महत्त्वाच्या पुराव्यासाठी होणार आहे. दरम्यान, मृतदेह पूर्णपणे कुजून गेलेला होता. यामुळे ही हत्याच असल्याचा संशय बांधण्यात आला.
या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची माहिती जाणून घेतली आणि ते म्हणाले की, सापडलेला मृतदेह एका महिलेचा असून तिच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या. सुरुवातीच्या तपासात हा मृतदेह दोन दिवसांआधीचा असल्याचे दिसून येते. मृतदेहाच्या आजूबाजूच्या सीसीटीव्हीचा तपास सुरु आहे. यातून मृतदेहाची ओळख पटण्यास मदत होईल, असे पोलिसांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : 30 वर्षानंतर 'नवपंचम राजयोग' ऑगस्ट महिन्यात येणार, 'या' राशीच्या लोकांना श्रीमंत करुन जाणार
परिस्थिती पाहता पोलिसांनी घटनेच्या तपासासाठी तीन-तीन पथके तयार केली आहेत. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा करत मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी स्थानिकांशी संपर्क साधला. या प्रकरणाच्या हत्येचं गुढ लवकरच समोर येईल, असा पोलिसांचा विश्वास आहे.