काकूचा पुतण्यावर जीव जडला, नवरा बाहेर जाताच पळून गेली, गावभर चर्चा अन् शेवटी काय घडलं?

मुंबई तक

Crime News : ज्या पुतण्यावर कुटुंबाने विश्वास टाकला, त्यानेच घराची मर्यादा ओलांडल्याने ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या नात्यांबद्दल अविश्वास निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. पती अजित कुमार आणि त्यांचे कुटुंबीय या घटनेमुळे पूर्णपणे खचले आहेत.

ADVERTISEMENT

Crime News Hindi
Crime News Hindi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काकूचा पुतण्यावर जीव जडला

point

नवरा बाहेर जाताच पळून गेली

point

गावभर चर्चा अन् शेवटी काय घडलं?

Crime News ,मैनपुरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील कुर्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेगमपूर करहल गावातून माणुसकी आणि नात्यांना लाजवणारी घटना समोर आली आहे. येथे एका काकूने आपल्याच सख्ख्या पुतण्यासोबत पळ काढल्याने संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली असून बातमी समजताच संपूर्ण कुटुंबाला धक्का बसलाय. 

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, बेगमपूर करहल येथील रहिवासी अजित कुमार यांचा संसार सुरळीत सुरू होता. दोन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी सुमन अचानक रात्रीच्या वेळी घरातून बेपत्ता झाली. सुरुवातीला कुटुंबियांनी नातेवाईकांकडे आणि परिसरात तिची खूप शोधाशोध केली, मात्र जेव्हा सत्य समोर आले तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. चौकशी दरम्यान असे समोर आले की, सुमन एकटी गेली नसून ती तिचा सख्खा पुतण्या हर्षित याच्यासोबत फरार झाली आहे. काकू आणि पुतण्यामध्ये गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध सुरू असल्याचे बोलले जात आहे. या अनैतिक संबंधांमुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाची वाताहत झाली आहे.

हेही वाचा : गडचिरोलीत बँकेची संवेदनशून्यता, कोमातील वृद्धेला न्यावे लागले थेट बँकेत; शाखा व्यवस्थापकाचा आडमुठेपणा

गावात चर्चेला उधाण, कुटुंबियांना मोठा धक्का

ज्या पुतण्यावर कुटुंबाने विश्वास टाकला, त्यानेच घराची मर्यादा ओलांडल्याने ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करत आहेत. या घटनेमुळे समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या नात्यांबद्दल अविश्वास निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. पती अजित कुमार आणि त्यांचे कुटुंबीय या घटनेमुळे पूर्णपणे खचले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp