लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार, आरोपी एका मुलीचा निघाला बाप
crime news : लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. संबंधित प्रकरणात आरोपीवर छळ करणे, जामिनाच्या अटींचे उल्लघन करणे, चारित्र्यहनन करणे आणि सायबर गुन्ह्याचा आरोप करण्यात आलाय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचार
महिलेला अश्लील आणि खाजगी फोटो पाठवले
Crime News : लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. संबंधित प्रकरणात आरोपीवर छळ करणे, जामिनाच्या अटींचे उल्लंघन करणे, चारित्र्यहनन करणे आणि सायबर गुन्ह्याचा आरोप करण्यात आलाय. पीडितेनं दिल्ली पोलीस आयुक्त शहाबाद डेअरी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणात आरोपीविरुद्ध एफआरआय नोंदवण्यात आला.
हे ही वाचा : पीडितेनं केली लिफ्टची मागणी, चालत्या कारमध्ये तीन तास आळीपाळीने अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचार
आरोपीने 2019 मध्ये शहाबाद डेअरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. पीडितेनं आरोप केला की, आरोपीने लग्नाचे वचन दिले होते. पीडितेनं एका मुलीला जन्म देखील दिला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार, एफएसएलने केलेल्या डीएनएच्या चाचणीत आरोपी हा मुलीचा जैविक पिता असल्याचे उघडकीस आले. न्यायालयाने आरोपीला काही अटींवर पीडितेला त्रास देणार नसल्याच्या अटीवर जामीन मंजूर केला.
महिलेला अश्लील आणि खाजगी फोटो पाठवले
तक्रारीनुसार, जामिनावर सुटून आल्यानंतर आरोपीने मानसिक छळ करण्यास सुरूवात केली होती. सप्टेंबर 2025 मध्ये आरोपीने मुंबईतील पीडितेच्या मैत्रिणीशी संपर्क साधला आणि तिनं लोकांची फसवणूक करून पैसे उकळले, तिच्यावर खोटे आणि अश्लील आरोप केले. एवढंच नाही, तर आरोपीने इतर महिलांसोबत स्वत:चे अश्लील आणि खाजगी फोटो पाठवून पीडितेला नकोसं केलं.
हे ही वाचा : लग्न होत नाही म्हणून आईनं पोटच्या लेकीला संपवलं, धाकटी बहीण होती सामील
पीडितेनं पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत काही प्रश्न उपस्थित केलेत. संबंधित प्रकरणात तिचा दावा, 2026 मध्ये तक्रार दाखल करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या एका अलीकडील ई-मेलमध्ये पीडितेनं दावा केला, शहाबाद डेअरी पोलिसांकडे दाखल केलेली तक्रार दिल्ली पोलिसांच्या संकेत स्थळावर अवैध असल्याची दर्शविली. पीडितेनं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळपणे हस्तक्षेप करत आरोपीचा जामीन रद्द करण्याची मागणी केली. नंतर एफआरआय दाखल करून कठोर शिक्षेची मागणी केली.
