पीडितेनं केली लिफ्टची मागणी, चालत्या कारमध्ये तीन तास आळीपाळीने अत्याचार

मुंबई तक

crime news : कुटुंबाशी भांडण करून तरुणी मैत्रिणीच्या घरी जात होती. याचदरम्यान दोन तरुणांनी पीडितेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने सोमवारी रात्री त्याचे अपहरण केलं. आरोपीने महिलेसोबत सामूहिक अत्याचार केला.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पीडितेला अडीच ते तीन तास बंद करून आत्याचार 

point

हॉटेलजवळ पीडितेला कारमधून फेकलं

Crime News : कुटुंबाशी भांडण करून तरुणी मैत्रिणीच्या घरी जात होती. याचदरम्यान दोन तरुणांनी पीडितेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने सोमवारी रात्री त्याचे अपहरण केलं. आरोपीने महिलेसोबत सामूहिक अत्याचार केला. पीडित तरुणीने आरोपींनी घरी सोडण्याऐवजी ते गाडीतच फिरवू लागले होते. मंगळवारी मध्यरात्री 3 वाजता एसजीएम नगर स्थित मुल्ला हॉटेल जवळ चालत्या गाडीतून पीडितेला फेकलं आणि घटनास्थळावरून फरार झाले.  

हे ही वाचा : प्रेमविवाह केला म्हणून वडिलांनी गर्भवती मुलीला नदीत बुडवलं, मृत्यूची स्थिती रेकॉर्ड

पीडितेचा घरात आईसोबत वाद 

संबंधित प्रकरणात शहर पोलिसांनी आरोपीवर तक्रार दाखल करत तपास सुरु केला. बहिणीने पोलिसांना सांगितलं की, सोमवारी रात्री 8:30 वाजता पीडितेचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की, घरात आईसोबत वाद झाला होता आणि ती तिच्या मैत्रिणीकडे जात होती.  त्यादरम्यान हा प्रकार घडला असता, काही वेळानंतर पुन्हा घरी परतली. 

पीडितेला अडीच ते तीन तास बंद करून आत्याचार 

रात्री उशिरापर्यंत 12 वाजता तिनं लिफ्टची मागणी केली होती. एका चार चाकी गाडीत दोन तरुण बसले होते. संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आलाय की, पीडितेला भलत्याच ठिकाणी नेण्यात आले होते. आरोपीने कारमध्ये महिलेला अडीच ते तीन तास मारुती इको कारमध्ये बंद ठेवलं. नंतर तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला. 

हॉटेलजवळ पीडितेला कारमधून फेकलं

पीडितेनं अनेकदा विरोध केला असता, आरोपीनं तिचं काहीही ऐकलं नाही. मंगळवारी मध्यरात्री तीन वाजता आरोपींना एसजीएमनगर येथील एका परिसरातील एका हॉटेलजवळ पीडितेला कारमधून फेकून देण्यात आलं. तरुणीच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या होता. तिच्या शरीरातून रक्त वाहताना दिसत होतं.