आई-मुलाच्या नात्याला काळिमा! पोटच्या दीड वर्षीय चिमुकलीला संपवलं

मुंबई तक

Crime News : महिलेनं आपल्या दीड वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याचा धक्कादायक आरोप आहे. आरोपी महिलेनं चिमुकलीला बेडरूममध्ये बंद करून ठेवले होते. त्यानंतर लहान मुलीचा गळा दाबून संपवलं.

ADVERTISEMENT

crime news (AI Photo)
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आईकडून दीड वर्षीय चिमुकलीची हत्या

point

नेमकं प्रकरण कसं झालं उघडकीस?

Crime News : एका महिलेनं आपल्या दीड वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याचा धक्कादायक आरोप आहे. आरोपी महिलेनं चिमुकलीला बेडरूममध्ये बंद करून ठेवले होते. त्यानंतर लहान मुलीचा गळा दाबून संपवलं. यानंतर पीडित मुलगी गंभीर जखमी झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, चिमुकलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकरणाचा तपास सुरू ठेवण्यात आला आहे. ही घटना केरळच्या तिरुवनंतपुरम येथील असून घटनेनं परिसर हादरून गेला आहे. आईची ख्रिस्ती अशी ओळख समोर आली. 

हे ही वाचा : विद्यार्थीनी शाळेत जाताना नराधम करायचा पाठलाग, पीडितेनं कंटाळून संपवलं जीवन

आईनंच पोटच्या दीड वर्षाच्या चिमुकलीला संपवलं

पोलिसांच्या माहितीनुसार, तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील मलयिनकीजु येथे एका दीड वर्षांच्या कथितरित्या मुलीवर तिच्याच आईने गळा दाबून तिची हत्या केली होती. मृत महिलेची इवाना अशी ओळख समोर आली. ही धक्कादायक घटना गुरूवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या दरम्यान घडली होती.

संबंधित प्रकरणात एफआरआयनुसार, आरोपी महिलेनं स्वत: चिमुकलीला एका बेडरूममध्ये बंद केलं आणि नंतर चाकूने हल्ला केला होता. ज्या हल्ल्यामुळे पीडित मुलीच्या मानेवर गंभीर जखम झाली. नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले असता, तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

आई आणि मुलगी घराबाहेर दिसत नसल्याच्या संशयावरून प्रकरण उघडकीस

आई आणि मुलगी घराबाहेर दिसत नसल्याच्या संशयावरून हे प्रकरण उघडकीस आले. एका महिलेनं बंद दरवाजा वाजवला होता. ख्रिस्तीनेच आपल्या लेकीचा खून केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.