त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरने उपचारासाठी तरुणीला कपडे काढायला सांगितले, अन् केलं संतापजनक कृत्य
crime news : त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरने उपचारासाठी तरुणीला कपडे काढायला सांगितले, अन् केलं संतापजनक कृत्य
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरने उपचारासाठी तरुणीला कपडे काढायला सांगितले

डॉक्टरकडून तरुणीवर अत्याचार
Crime News : बेंगलोर शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञाला (स्किन डॉक्टर) 21 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली झालेल्या या कृत्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना 18 ऑक्टोबर रोजी घडली.
अधिकची माहिती अशी की, तरुणीला त्वचेच्या संसर्गाचा त्रास होत असल्याने ती उपचारासाठी डॉ. प्रवीण यांच्या खासगी क्लिनिकमध्ये गेली होती. सुरुवातीला डॉक्टरांनी नियमित चौकशी करत उपचाराची माहिती घेतली. मात्र काही वेळानंतर डॉक्टरांची वागणूक संशयास्पद वाटू लागली. उपचाराच्या बहाण्याने त्यांनी तरुणीला कपडे काढण्यास सांगितले आणि तिच्याशी गैरवर्तन केले. डॉक्टरांनी तिला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला, मिठी मारली आणि तिच्या इच्छेविरुद्ध किस घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
फक्त एवढेच नव्हे, तर डॉक्टरांनी तरुणीशी अश्लील संभाषण केले आणि एका हॉटेलमध्ये भेटण्याचा प्रस्ताव देखील मांडला. या वागणुकीमुळे घाबरलेल्या तरुणीने कसाबसा तिथून पळ काढला. घरी पोहोचताच तिने संपूर्ण घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.
हेही वाचा : ऐन दिवाळीत कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर भीषण अपघात, भाऊबीजेपूर्वी भावासह बहिणीचा चिरडून मृत्यू