महागडा स्मार्टफोन घेण्यावरून आईसोबत वाद; 15 वर्षीय मुलीचं भयंकर पाऊल
Crime News : विशाखापट्टणममध्ये महागडा स्मार्टफोन घेण्याच्या मागणीवरून आईसोबत झालेल्या वादानंतर 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नववीत शिकणाऱ्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महागडा स्मार्टफोन घेण्यावरून आईसोबत वाद
15 वर्षीय मुलीचं भयंकर पाऊल
Crime News : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे महागडा स्मार्टफोन घेण्याच्या मागणीवरून आईसोबत झालेल्या वादानंतर 15 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही मुलगी नववी इयत्तेत शिकत होती. ती आई आणि भावासोबत राहत होती. आई-वडिलांमध्ये वैवाहिक मतभेद असल्याने दोघे वेगळे राहत होते.
हेही वाचा : आधी बापाने केला बलात्कार, नंतर पुजाऱ्यानेही केलं लैंगिक शोषण; अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?
महागडा मोबाइल फोन घेणे परवडणारे नव्हते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संबंधित मुलगी महागडा आणि उच्च श्रेणीतील मोबाइल फोन घेण्यासाठी आईकडे सातत्याने मागणी करत होती. तिच्या मैत्रिणींकडे त्याच मॉडेलचा मोबाइल फोन असल्याचे पाहिल्यानंतर तिलाही तो मोबाइल हवा होता. मात्र, मुलीची आई रोजंदारीवर काम करत असल्याने महागडा मोबाइल फोन घेणे तिला परवडणारे नव्हते. त्यामुळे मोबाइल फोनच्या मागणीवरून आई आणि मुलीमध्ये सातत्याने वाद होत होते.
हेही वाचा : पुणे : श्रावणात मटणाचा हट्ट, बापाने लेकाला गळा दाबून संपवलं; आईने काय केलं बघाच...
