आधी बापाने केला बलात्कार, नंतर पुजाऱ्यानेही केलं लैंगिक शोषण; अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?
एका अल्पवयीन मुलीवर बापाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार आईच्या लक्षात आल्यानंतर तिने मुलीला एका नातेवाईकाकडे पाठवून दिले. मात्र तिथेही तिच्यासोबत भयंकर घटना घडली. कर्नाटकातील हा प्रकार नेमका काय आहे, जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आधी बापाने केला बलात्कार
नंतर पुजाऱ्यानेही केलं लैंगिक शोषण
अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?
Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तिच्या वडिलांसह एका नातेवाईकाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समुपदेशनादरम्यान मुलीने दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी ही कठोर कारवाई केली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कर्नाटकातील यादगीर परिसरातील ही घटना आहे.
आईला समजलं अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने आरोप केला आहे की, ती लहान असताना तिच्या वडिलांनी तिच्यासोबत चुकीचे वर्तन करून तिचे लैंगिक शोषण केले होते. ही गंभीर बाब जेव्हा मुलीच्या आईच्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी पोटच्या मुलीचे रक्षण करण्याऐवजी तिला आणि तिच्या मोठ्या बहिणीला एका नातेवाईकाकडे राहण्यासाठी पाठवून दिले.
हे ही वाचा : नागपूर : 11 वर्षीय मुलीशी 24 वर्षीय तरुणाचे अश्लील चॅटिंग, शेवटी काय घडलं?
पुजाऱ्यानेही केले अत्याचार
नातेवाईकाच्या घरी आश्रयाला गेलेल्या मुलीच्या नशिबी दुर्दैव पाठ सोडत नव्हते. नातेवाईकाच्या घरी राहत असताना तिथे येणाऱ्या एका पुजाऱ्यानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप पीडित मुलीने केला आहे. एकापाठोपाठ एका अशा दोन नराधमांच्या कृत्यामुळे मुलीवर मोठा मानसिक आघात झाला आहे.
हे ही वाचा : पुणे : श्रावणात मटणाचा हट्ट, बापाने लेकाला गळा दाबून संपवलं; आईने काय केलं बघाच...
पॉक्सोअंतर्गत गुन्हा
मुलीने दिलेल्या सविस्तर जबाबाच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 75(2) आणि 65(2) तसेच पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम 4, 8 आणि 10 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
