बायकोनं दारूत विष मिसळून नवऱ्याला संपवलं, त्यावरच लिहिलं पुस्तक
Crime News : महिलेनं दारूमध्ये विष मिसळून आपल्याच पतीची हत्या केली. नंतर त्यावरच पुस्तक लिहिलं आणि सहानुभूती मिळवली. नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलांना अनेकदा त्रास देखील झाला होता. दरम्यान, वडिलांच्या मृत्यूनंतर चार वर्षानंतर न्यायालयाने महिलेला दोषी पकडलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हिलेनं दारूमध्ये विष मिसळून आपल्याच पतीची हत्या केली
मुलांनी ओढावलेल्या संकटाविषयी सांगितलं भयंकर
Crime News : अमेरिका येथील यूटामध्ये महिलेनं दारूमध्ये विष मिसळून आपल्याच पतीची हत्या केली. नंतर त्यावरच पुस्तक लिहिलं आणि सहानुभूती मिळवली. नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलांना अनेकदा त्रास देखील झाला होता. दरम्यान, वडिलांच्या मृत्यूनंतर चार वर्षानंतर न्यायालयाने महिलेला दोषी पकडण्यात आलं होतं. अशातच मुलांनी याबाबत सांगितलं की, त्यांची आई जेव्हा कधी तुरुंगातून बाहेर पडते तेव्हा त्यांना असुरक्षित वाटत नाही. अमेरिकेच्या न्यायालयाने बुधवारी महिलेला जन्मठेपेच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली, तसेच ती पॅरोलवर देखील बाहेर पडू शकत नाही. संबंधित प्रकरणातील आरोपीची ओळख कूरी रिचन्सि (वय 35) आणि मृत नवऱ्याची रिचिन्स अशी ओळख समोर आली.
हे ही वाचा : त्याच्यासाठी बॉयफ्रेंडचा खून, सविता निघाली मास्टरमाइंड; हादरवणारं प्रेम
नेमकं काय घडलं?
2022 मध्ये कूरीने आपल्या पतीच्या दारूमध्ये विष मिसळलं होतं. कूरीला फसवणूक, धोका, विमा फसवणूक आणि हत्येचा प्रयत्न यासह इतर चार गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. कूरी रिचन्सने यापूर्वी देखील तिच्या पतीला मारण्याचा कट रचला होता. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यानुसार, व्हेलेंटाईन डेच्या काही आठवड्यांपूर्वी तिने एरिकला फेंटॅनिल मिसळलेले सँडविच घाऊ घालून विष देण्याचा प्रयत्न केला होता.
कौरीवर लाखो डॉलर्जचे कर्ज
सँडविच खाल्यानंतर एरिकची प्रकृती बिघडली होती, पण तो वाचला होता. शिक्षा सुनावताना न्यायाधीश रिचर्ड माराझी म्हणाले, असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला असंच मोकळं सोडता कामा नये, योग असा की, शिक्षा सुनावणीच्या दिवशी एरिक रिचन्सचा 44 व्या दिवशी वाढदिवस साजरा करण्यात आला होता. सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की, कौरीवर लाखो डॉलर्जचे कर्ज होते आणि ती दुसऱ्या पुरुषासोबत भविष्याचं प्लानिंग केलं होतं.
तिने पतीच्या नकळत अनेक आयुर्विमा पॉलिसी काढल्या होत्या आणि ती दुसऱ्या पुरुषासोबत भविष्याची योजना आखत होती. तिने आपल्या पतीच्या नकळत आयुर्विमा पॉलिसी काढल्या होत्या आणि नंतर तिचा विश्वास होता की, त्याच्या मृत्यूनंतर तिला 4 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिकची संपत्ती मिळेल. या प्रकरणाने संपूर्ण अमेरिकेत एकच खळबळ उडाली.
तिला अटक होण्यापूर्वी कौरीने एका पुस्तकात प्रचार केला होता, ज्यात मुलाच्या वडिलांना गमावण्याचे दुःख त्यात नमूद केलं होतं. एरिक रिचन्सचे वडील, युजीन रिचन्स यांनी नातवंडांच्या संरक्षणासाठी कौरीला पॅरोलशिवाज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. वडिलांच्या मृत्यूवेळी कौरीची मुलं वय वर्षे नऊ, सात आणि पाच वर्षांचे होते.









