लैंगिक संबंध ठेवण्यास बायकोचा नकार, तरुणावर बॅटने हल्ला करत संपवलं
crime news : लग्नाच्या पाच महिन्यांनंतर तरुणाला मारहाण करून ठार करण्यात आले. पत्नीसोबत मतभेद आणि वैवाहिक वादांबाबत मेहुण्याकडे तक्रार करणे त्याला महागात पडले, असा आरोप आहे. दिवाळीच्या दिवशी झालेल्या वादादरम्यान मेहुणा, त्याची पत्नी आणि कुटुंबीयांनी त्या तरुणावर बॅटने हल्ला करत संपवलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लग्नाच्या पाच महिन्यांनंतर मारहाणीत तरुण ठार
वैवाहिक वादांबाबत मेहुण्याकडे तक्रार करणे पडले महागात
Crime News : बिहारच्या बेगूसराय येथे लग्नाच्या पाच महिन्यांनंतर तरुणाला मारहाण करून ठार करण्यात आले. पत्नीसोबत मतभेद आणि वैवाहिक वादांबाबत मेहुण्याकडे तक्रार करणे त्याला महागात पडले, असा आरोप आहे. दिवाळीच्या दिवशी झालेल्या वादादरम्यान मेहुणा, त्याची पत्नी आणि कुटुंबीयांनी त्या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे. डोक्यात बॅटने हल्ला करत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
हे ही वाचा : आळंदी हादरली! तीर्थक्षेत्र परिसरात तरुणावर दिवसाढवळ्या तिघांकडून वार
मृत व्यक्तीची अभय चौधरी (वय 30) अशी ओळख पटली आहे. जून 2026 मध्ये अभयने मल्हीरपूर येथील रहिवासी नंदिनी कुमारी हिच्याशी विवाह झाला होता. हा विवाह अभयचा चुलतभाऊ प्रवीण चौधरीने त्याच्या वहिनीने ठरवला होता. कुटुंबाचा आरोप केला की, लग्नापासून या जोडप्याच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता आणि या मुद्द्यांवरून त्यांच्यात सतत वाद निर्माण झाला.
कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या पाच महिन्यांच्या काळात नंदिनी फक्त तीन वेळा सासरच्या घरी गेली होती. प्रत्येक वेळी ती काही दिवस राहायची आणि कोणत्या ना कोणत्या निमित्ताने माहेरी परत जायची. अभयने वारंवार विनंती करूनही, तिने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा नकार दिला. कुटुंबाचा दावा असा की,तिने या प्रेमसंबंधात रस नसल्याचे सांगितले होते. सासरच्या घरी राहण्यासाठी दबाव आल्यानंतर ती घरातून पळून गेली आणि जीवन संपवल्याची धमकी दिली, असाही आरोप करण्यात आला.
लैंगिक संबंध ठेवण्यास बायकोचा नकार
मयत वधूचे वडील, अमरेश चौधरी यांनी सांगितलं की, लग्नावेळी वधू चार दिवस माहेरी राहिली होती. त्यानंतर ती सासरच्या घरी परतली आणि परत जाण्यापूर्वी सुमारे 17 दिवस तिथेच राहिली होती. याच काळात अभयच्या लक्षात आले की, त्याच्या पत्नीला त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवायचे नाहीत. त्याने तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
अमरेश चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, अभयने समस्येबाबत आपल्या पत्नीच्या आई वडिलांकडे आणि ज्याने हा विवाह जुळवून दिला होता त्याचा चुलत भाऊ प्रवीण चौधरी यांच्याकडे तक्रार केली होती. मुलीच्या कुटुंबीयांनी कथितरित्या उत्तर दिलं की, तिला तिच्या इच्छेनुसार जगू द्यावे. तिला जेव्हा वाटेल तेव्हाच ती तिच्या पतीसोबत राहील. मृताच्या वडिलांचा दावा आहे की, या तक्रारीमुळे दोन्ही कुटुंबामधील तणाव आणखी वाढू लागला.
बायकोच्या माहेरच्या मंडळींनी अभयच्या डोक्यात बॅटने केला प्रहार
दिवाळीच्या दिवशी नंदिनीचा तिच्या सासरच्या मंडळींशी पुन्हा वाद झाला. त्यानंतर तिने आई वडिलांना बोलावले. या घटनेची माहिती समजताच, प्रवीण चौधरी आणि कुटुंबीय अभयच्या घरी आले. या प्रकरणात असा आरोप केला की, आधी अभयच्या आई वडिलांना मारहाण करण्यात आली आणि अभयच्या डोक्यात बॅटने हल्ला केला. त्यानंतर अभयला मारहाण केली आणि तो गंभीर जखमी झाला.
यानंतर अभयला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला पाटणा येथे हलविण्यात आले होते. तिथे अभयवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रवीण चौधरी, त्याची पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी मिळून हा कट रचल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.
हे ही वाचा : 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचे महिलेशी प्रेमसंबंध, तरुणाची केली हत्या अन्..
अभयच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी विलंब केल्याने लोक संतप्त झाले. हत्येमागे सहभागी असलेल्या इतर काही व्यक्तींची नावे एफआयआरमध्ये सामाविष्ट करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. मृत मुलीचा चुलत भाऊ आणि मेहुणा, प्रवीण चौधरी, आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
