दोन मुलं असताना विवाहबाह्य संबंध, पतीने पत्नीला चाकूने वार करुन संपवलं
Delhi Crime News : दिल्लीतील पालम परिसरात पत्नीची चाकूने हत्या केल्याप्रकरणी 36 वर्षीय पतीला पोलिसांनी अटक केली. विवाहबाह्य संबंधाच्या आरोपावरून झालेल्या वादानंतर हत्या केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन मुलं असताना विवाहबाह्य संबंध
पतीने पत्नीला चाकूने वार करुन संपवलं
Delhi Crime News : दिल्लीतील पालम परिसरात पत्नीची चाकूने वार करून हत्या केल्याप्रकरणी 36 वर्षीय पतीला पोलिसांनी अटक केली आहे. विवाहबाह्य संबंधाच्या आरोपावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनिया (30) असं मृत पत्नीचे नाव असून प्रदीप असे आरोपी पतीचे नाव आहे.
हेही वाचा : दृश्यम 3 पाहून वडिलांची हत्या; 2 हजार किमी प्रवास, पत्नीला केलेल्या एका फोनमुळे आरोपी अडकला
सोनिया यांच्या छातीवर आणि मानेवर केले चाकूने वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप हा बिर्याणीचा स्टॉल चालवतो. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 4.49 वाजता पालम येथील जे.जे. कॉलनीतील काली माता मंदिराजवळ चाकूने हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना पीसीआर कॉलद्वारे मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता सोनिया (30) या जखमी अवस्थेत आढळून आल्या. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांच्या तपासात सोनिया यांनी पती प्रदीपच्या कथित विवाहबाह्य संबंधाबाबत त्याच्याकडे जाब विचारल्याचे समोर आले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद वाढल्यानंतर प्रदीपने सोनिया यांच्या छातीवर आणि मानेवर चाकूने अनेक वार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा : विवाहबाह्य प्रकरणाबाबत बायकोनं नवऱ्याला विचारला जाब, पतीने धारदार शस्त्राने संपवलं
