अभिनेता व्हायचं होतं, मुंबईला येणार होता पण…; प्रकरण कळल्यावर पोलीस हादरले
Delhi man tried to do unnatural sex with minor : एका 45 वर्षाच्या तरूणाची अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास दबाव टाकल्याप्रकरणी त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेतील आरोपीचे वय ऐकूण तुम्हाला धक्का बसणार आहे.
ADVERTISEMENT
Delhi man wanted to be actor but her face death : दिल्ली एका 45 वर्षीय व्यक्तीच्या हत्येनंतर हादरल आहे. या घटनेतील मृतदेह रस्त्यावरील फुटपाथवर सापडला होता. घटनास्थळावरून पोलिसांच्या हाती काहिच लागले नव्हते, त्यामुळे आरोपीचा शोध घेण्याची पोलिसांसमोर कसोटी होती. या घटनेत ना सीसीटीव्ही फुटेज मिळालं, ना मृत व्यक्तीची ओळख पटत होती. त्यामुळे गुन्ह्याचा उलगडा नेमका कसा करायचा, असे आव्हान पोलिसांसमोर होते. सुदैवाने या घटनेत एक प्रत्यक्षदर्शी सापडला आणि त्याच्या आधारे पोलिसांनी घटनेचा उलगडा केला. (delhi man tried to do unnatural sex with minor killed him shocking story)
ADVERTISEMENT
घटनाक्रम काय?
गेल्या 15 एप्रिल रोजी कोतवाली परीसरातील फुटपाथवर एका तरूणाचा मृतदेह आढळला होता. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना (police) दिली होती.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत 45 वयाच्या तरूणाचा मृतदेह ताब्यात घेतला होता.यानंतर घटनास्थळावर क्राईम टीम आणि एफएसएलने जाऊन तपास सुरु करायला सुरुवात केली. या तपासादरम्यान पोलिसांना एक प्रत्यक्षदर्शी सापडला जो मृतकाचाच मित्र होता. या प्रत्यक्षदर्शीने मृतकाची ओळख शंभू अशी सांगितली, मात्र त्याला शंभू विषयीची इतर माहिती माहित नव्हती. त्याच्या कुटूंबात कोण आहे? वडिलांचे नाव काय आहे? त्यामुळे ओळख न पटल्याने पोलिसांना 72 तास मृतदेह भाजी मंडईच्या शवागरात ठेवावा लागला होता.
मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांना शंभूची हत्या एका 16 वर्षाच्या अल्पवयीनने केल्याची माहिती मिळाली. हा अल्पवयीन बिहारच्या शेखपुरा परीसरात राहायचा. पोलिसांनी तपास करत या अल्पवयीनला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी या आरोपीची चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासे केले होते.
हे वाचलं का?
अनैंसर्गिक संबंधांसाठी जबरदस्ती
पोलिसांना अल्पवयीन आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, काश्मिरी गेटच्या बाजारात हमालीचे काम करायचा. त्यानंतर मुंबईत जाऊन सिनेमात काम करण्यासाठी दोन वर्षापूर्वी घर सोडले होते. यावेळी जुन्या दिल्लीत त्याची भेट शंभूशी झाली होती. या भेटीनंतर दोघेही एकत्र राहायला लागले होते. या दरम्यान गेल्या एक-दोन महिन्यापासून शंभू अनैसर्गिक लैंगिक संबंध (unnatural sex) (ज्या लैंगिक संबंधातून संतान प्राप्ती होत नाही) ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा. 14 एप्रिलला देखील शंभूने अशाचप्रकारे अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला होता. या दरम्यान दोघांमध्ये भांडणे झाली. या भांडणादरम्यान अल्पवयीन आरोपीने शंभूची हत्या केली होती.
अल्पवयीन आरोपीने हत्येची कबूली दिल्यानंतर पोलिसांनी जेजे बोर्डासमोर हजर केले आणि त्याला निरीक्षण गृहात ठेवले होते. सध्या अल्पवयीन आरोपीला जुवेनाईल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. ही घटना दिल्लीत घडलीय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT