मद्यप्राशन करून पोलिसाच्या कुत्र्याला…, घडली आयुष्यभरासाठी अद्दल

मुंबई तक

ADVERTISEMENT

drunk man bite dog many time arrested police fine viral story
drunk man bite dog many time arrested police fine viral story
social share
google news

दिल्लीतून पिटबुल डॉग (Pitbull dog)  हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. या अनेक घटनांमध्ये पिटबूल डॉगने चिमुकल्यांचा व डिलिव्हरी बॉयला चावा घेतल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे नागरीकांमध्ये एकप्रकारे पिटबुल डॉगची दहशत निर्माण झाली होती. अशात आता एक विचित्रच घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने थेट कुत्र्यांच्या चावा घेतल्याची घटना घडली आहे. निव्वळ एकदा नव्हे तर अनेकदा त्याने हा प्रकार केला आहे. मद्यधुंद (Drunk man) अवस्थेत त्याच्याकडून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हा कुत्रा साधासुधा नव्हे तर थेट पोलिसांच्या ताफ्यातला कुत्रा होता. त्यामुळे या घटनेने एकच खळबळ माजली आहे. तसेच पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत त्याला दंड ठोठावला आहे. (drunk man bite dog many time arrested police fine viral story)

ADVERTISEMENT

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, अमेरीकेत राहणारा जमाल विंग नावाचा 47 वर्षीय व्यक्ती रॅश ड्रायव्हिंग करत होता. त्याच्या या रॅश ड्रायव्हिंगचा प्रकार डेलावर स्टेट पोलिसांनी पाहिला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबवून सुरुवातीला कमी वेगात गाडी चालवण्याची सुचना केली. मात्र त्याने पोलिसांची ही सुचना मानली नाही. त्यामुळे पोलिसांनी चालकाला गाडी बसण्यास सांगितले. मात्र पोलिसांच्या सांगण्यावरून देखील चालक गाडीत बसलाच नाही. त्यामुळे पोलिसासोबत असलेल्या एका दुसऱ्या पोलिसांने आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या DSP K9 नावाच्या कुत्र्याने चालकाला गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने थेट पोलिसासोबत असलेल्या कुत्र्याचाच चावा घ्यायला सुरुवात केली. एक-दोन नव्हे तर अनेकदा त्याने कुत्र्याचा चावा घेत त्याला जखमी केले होते. या घटनेने कुत्रा गंभीर जखमी झाला होता.

हे ही वाचा : बारामतीत खळबळ! दगडाने डोक्याचा केला चेंदामेंदा, ऊसात सापडला मृतदेह

चालकाने खूप दारू प्यायली होती. त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत त्याच्याकडे ही घटना घडली होती.या घटनेंनतर तत्काळ चालकाला नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. कारण कुत्र्याचा चावा घेतल्याने त्याची अवस्था बिकट होण्याची शक्यता होती. याचसोबत कुत्रा देखील या अपघातात जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेतून चालक बरा झाल्यानंतर पोलिसांनी ऑनड्युटी पोलिसांवर आणि त्याच्या कुत्र्यावर हल्ला केल्याप्रमाणे आणि वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी त्याला 34,200 डॉलरचा म्हणजेच भारतीय चलनानुसार 2 लाख 80 हजार 892 चा दंड ठोठाला लागला. ही रक्कम रोख स्वरूपात भरावे अशी मागणी देखील करण्यात आली. या घटनेने चालकाला मोठा धक्का बसला होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Kalyan Crime: दोन कॉलगर्ल्सना घरी बोलावलं अन गेला जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT