लग्न लावून दिलेल्या प्रेयसीला घरी आणलं अन् प्रियकरानं…

मुंबई तक

ADVERTISEMENT

due to familys opposition to love a couple committed suicide by consuming poison in hadgaon in nanded
due to familys opposition to love a couple committed suicide by consuming poison in hadgaon in nanded
social share
google news

Crime News: नांदेड: प्रेमाला विरोध असल्याने एका प्रेमी युगुलाने एकत्रच आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कदायक घटना आठ दिवसांपूर्वी नांदेड (Nanded) जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील दर्याबाई उमरी गावात घडली आहे. दोन्हीकडील कुटुंबीयांना प्रेमविवाह कबूल नसल्याने तरुण-तरूणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हदगाव पोलिसांनी बुधवारी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. (due to familys opposition to love a couple committed suicide by consuming poison in hadgaon in nanded)

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अंजली आणि आकाश या दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. ज्यामुळे आता संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंजली थोरात ही लहान असतानाच तिच्या आईचं निधन झालं होतं. त्यामुळे ती हदगाव तालुक्यातील दर्याबाई उमरी गावात आजोबांसोबत राहू लागली होती. शिक्षणादरम्यान ती गावातील आकाश वाठोरे या तरुणाच्या प्रेमात पडली.

अधिक वाचा- पुण्यात क्रूर कांड, अनेक पुरुषांशी अनैतिक संबंध? दिराने पळवून आणलं अन् नंतर वहिनीलाच…

पण जेव्हा दोघांच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रेम-प्रकरणाची कुणकुण लागली तेव्हा दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रेमाला प्रचंड विरोध केला. अंजलीने आकाशसोबत पळून जाऊन लग्न वैगरे करू नये यासाठी लागलीच अंजलीच्या मामाने तिचे एका नातेवाईकाशी लग्न लावून दिले.

हे वाचलं का?

लग्नानंतर अंजली आणि तिचा नवरा पुण्यात राहू लागले. त्यानंतरही आकाश आणि अंजली या दोघांमध्ये बोलणी सुरू होती. त्यामुळे मुलीच्या घरच्यांना काळजी वाटत होती. काही दिवसांनी आकाश वाठोरे थेट अंजलीच्या घरी गेला आणि तिला घेऊन गावी परत आला. यावेळी त्यांना जाणीव होती की, त्यांचे हे प्रेमसंबंध कुटुंबीय कधीही मान्य करणार नाही. त्यामुळेच 29 मार्च रोजी प्रेमी युगुलाने विष प्राशन केलं. एकत्र राहता येत नाही तर काय झाले, एकत्र मरू द्या.. असं म्हणत दोघांनीही विष प्राशन केलं.

अधिक वाचा- विकृतीचा कळस! अंध महिलेवर पतीसमोरच लैंगिक अत्याचार

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच दोघांनाही नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण दुर्दैवाने 30 मार्च रोजी दोघांचाही मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हदगाव पोलिसांनी बुधवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली, दरम्यान, या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT