धक्कादायक! ऑनलाईन AK-47 मागवली, नंतर 8 वर्षीय मुलाने घरातच…
नेदरलॅंडची रहिवाशी असलेल्या एका महिलेच्या 8 वर्षीय मुलाने ऑनलाईन AK-47 राय़फल खरेदी केली आहे. ही रायफल ज्यावेळेस तिच्या घरी पोहोचली, त्यावेळेस तिला मोठा धक्का बसला होता. आईने नंतर काळजीपोटी या सर्व घटनेचा शोध घेतला त्यावेळेस तिला धक्कादायक माहिती मिळाली.
ADVERTISEMENT
आजकालची तरूण पिढी ही खूपच टेक्नोसॅवी आहे. कोणतेही तंत्रज्ञान सहज हाताळते. याची उदाहरण तुम्हाला तुमच्या घरात किंवा आजूबाजूला पाहायला मिळतील. मात्र तंत्रज्ञानाची इतक्या आहारी जाणे या पिढीला कधी कधी धोकादायक ठरू शकते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका 8 वर्षीय मुलाने थेट ऑनलाईन AK-47 रायफल मागवली होती, आणि ही राय़फल त्याच्या घरी देखील पोहोचली आहे. हा सर्व प्रकार आईला कळताच तिला मोठा हादरा बसला आहे.(eight year boy bought ak 47 rifle online deliveres home shocking story)
ADVERTISEMENT
नेदरलॅंडची रहिवाशी असलेल्या एका महिलेच्या 8 वर्षीय मुलाने ऑनलाईन AK-47 राय़फल खरेदी केली आहे. ही रायफल ज्यावेळेस तिच्या घरी पोहोचली, त्यावेळेस तिला मोठा धक्का बसला होता. आईने नंतर काळजीपोटी या सर्व घटनेचा शोध घेतला त्यावेळेस तिला धक्कादायक माहिती मिळाली. इंटरनेटमधील डार्क वेबच्या माध्यमातून मुलाने ही रायफल मागवली होती. डार्क वेब हा तो प्लॅटफॉर्म आहे, ज्यावरून अवैध मार्गाने कोणत्याही गोष्टी खरेदी करता येतात. त्यामुळे आपल्या मुलाने अशा वेबसाईटच्या माध्यमातून अवैध मार्गाने गोष्टी मागविल्याचे कळताच तिच्या पायाखालची जमीन सरकली.
हे ही वाचा : Pune Crime : पत्नी-पुतण्याला का घातल्या गोळ्या? कारण येणार समोर, पोलिसांना तपासाचा मार्ग सापडला
डार्क वेब काय आहे?
डार्क वेब हा इंटरनेटचा असा एक भाग आहे, जिथे सध्याची सामग्री Google, Bing सारख्या सर्च इंजिनद्वारे ऍक्सेस करता येत नाही. यासाठी स्पेशल ब्राऊझर आणि परमिशनची आवश्यकता असते. डार्क वेबवरील कंटेट कोणत्याही कायद्याच्या कक्षेत येत नाही. या वेबसाईटच्या माध्यमातून ड्रग्स आणि शस्त्रांस्त्र खरेदी करता येते. ही साईट ओनियन राऊटींगवर कार्य करते, हे वापरकर्त्यांची ट्रॅकिंग आणि पाळत ठेवण्यापासून सरंक्षण करते. या वेबसाईटवर काही स्कॅमर देखील असतात. हे स्कॅंमर ज्या वस्तुंवर बंदी असते त्या वस्तु स्वस्तात विकतात. आणि स्वस्त वस्तु खरेदी करण्याच्या चक्करमध्ये लोक लाखो रूपये गमावतात. अशाच स्कॅमरच्या जाळ्यात महिलेच्या मुलगा फसला असल्याची माहिती समोर आली आहे.
हे वाचलं का?
युरोन्युजला दिलेल्या मुलाखतीत मुलाची आई बारबरा जेमेन सांगते की, माझा मुलगा कंप्युटरवर खूप वेळ घालवतो. 8 वर्षात त्याने हॅकिंग शिकली आहे. तसेच माझ्या मुलाचा वापर हॅकर्सने मनी लॉडरिंगसाठी केल्याचा आरोपही बारबरा जेमेन यांनी केला आहे. रायफल घऱी आल्यावर मी ती स्थानिक पोलिसांकडे सुपुर्द केली आहे. तसेच पोलिसांनी माझ्या मुलाची चौकशी करून त्याला सोडून दिले आहे.
हे ही वाचा : Pune Crime News : महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार! सावकाराचं भयंकर कृत्य
दरम्यान पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता 8 वर्षीय मुलगा हा आंतरराष्ट्रीय हॅंकर्सच्या जाळ्यात फसल्याचे समोर आले होते. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT