Crime:मित्रासाठी चिरला गळा, पार्किंगवरून सिक्युरिटी गार्डलाच संपवलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

wife murdered husband cut pieces abd dumped dead body in canal pilibhit uttar pradesh crime story
wife murdered husband cut pieces abd dumped dead body in canal pilibhit uttar pradesh crime story
social share
google news

झारखंडच्या (jharkhand) रांचीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका सिक्युरीटी गार्डची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. विद्यानंद असे या सिक्युरीटी गार्डचे नाव आहे. मित्राची रिक्षा सोसायटीत पार्क करण्यास विरोध केल्याने विद्यानंद यांची हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हत्या करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून सिक्युरीटी गार्डचा मित्रच होता. त्यामुळे या घटनेने खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी (police) आरोपीला अटक केली आहे.तसेच या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. (friend killed the friend for stopped from parking the auto jharkhand crime story)

रांची शहरातील तुपुदाना ओपी परीसरातली बरसागढच्या ओम डेवलपर्स अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे. या अपार्टमेंटमध्ये विद्यानंद वर्मा सिक्युरीटी गार्डची नोकरी करायचा. तर संजय मिश्रा नावाचा व्यक्ती रीक्षा चावण्याचा काम करायचा. हे दोघेही एकमेंकाना ओळखायचे, दोघांची चांगली मैत्री होती. तसेच दोघांच एकमेकांसोबत बसण उठण असायचं. शनिवारी मध्यरात्री विद्यानंद यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या घटनेची माहिती मि्ळताच पोलिस घटनास्थळी गाठत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता.

हे ही वाचा : मुंबई ते चंद्रपूर… सेल्फीने ढकललं मृत्यूच्या जबड्यात! कुणी आई गमावली, तर कुणी तरूण मुलं

दरम्यान पोलिसांनी तक्रार दाखल करून हत्येचा तपास सुरु केला होता. यावेळी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करून तपास सुरु केला होता. यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय मिश्रा हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले होते. सुरुवातीला संजय मिश्रा यांनी पोलिसांना तपासात चकवा देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवताच संजय मिश्राने हत्येची कबूली दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आरोपीने दिलेल्या माहितीनूसार, अपार्टमेंटच्या पार्किंगमध्यने नेहमीच रिक्षा पार्क करायचो. पण सिक्युरीटी गार्ड विद्यानंद याला नेहमी विरोध करायचा. शनिवारी देखील विद्यानंद तेच केले होते. यानंतर त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला. आणि रागाच्या भऱात विद्यानंद यांची धारदार शस्त्राने हत्या केली. या प्रकरणाचा तपास करणारे सिटी एसपी शुभांशु जैन म्हणाले की,आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपीकडून हत्ये दरम्यान वापरण्यात आलेले शस्त्रही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी संजय मिश्रा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हे ही वाचा : Crime: दिराचं भयंकर कृत्य! वहिनीची हत्या केली अन् मृतदेह…; खुनाचं कारण आलं समोर

    follow whatsapp

    ADVERTISEMENT