Satara Crime: सोशल मीडियावर ओळख अन् शाळेतील मुलीवर लॉजवर लैंगिक अत्याचार

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

friendship on social media and sexual abuse of a school girl at lodge satara crime
friendship on social media and sexual abuse of a school girl at lodge satara crime
social share
google news

सातारा: सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर साताऱ्यातील कॅफे, तसेच लॉजमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी साताऱ्यातील शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (friendship on social media and sexual abuse of a school girl at lodge satara crime)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी संकेत मेंगणे (वय 19 वर्ष रा. मेंगणेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, हल्ली रा. शिक्रापूर, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा शहर परिसरात एक अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांसमवेत राहण्यास आहे. इयत्ता नववीत शिकण्यास असलेल्या मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमातून संकेत नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. हळूहळू ही ओळख वाढत गेली आणि सोशल मीडियावर दोघे एकमेकांशी सातत्याने संपर्क साधत गेले.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> CCTV: पुण्यात तरुणाने थेट महिलेच्या कानशिलात लगावली, उच्चभ्रू सोसायटीत काय घडलं?

दोघातील संवाद वाढत गेल्याने संकेत मेंगणे हा वारंवार साताऱ्यात येऊ लागला. त्याचवेळी संकेत हा अल्पवयीन तरुणीला वारंवार भेटत होता. फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान संकेतने मुलीसोबत अनेक फोटो आणि व्हिडिओ काढले होते. पण काही दिवसांनी आपल्याकडील हे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी संकनेत अल्पवयीन मुलीला देण्यास सुरुवात केली. याच गोष्टीची भीती दाखवून संकेतने मुलीकडे शरीरसुखाची मागणी देखील केली.

हे ही वाचा>> शेजाऱ्यासोबत अनैतिक संबंधाचा संशय, नवऱ्याने रागाच्या भरात पत्नीची…

त्यानंतर संकेत मेंगणेने अल्पवयीन मुलीला साताऱ्यातील एका लॉजमध्ये नेलं तसेच एका कॅफेत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पण हे संपूर्ण प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. तर आरोपी संकेत मेंगणे हा वारंवार पीडित मुलीस त्रास देत होत. अखेर या सगळ्या प्रकाराला वैतागून पीडित मुलीने याबाबतची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी देखील शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ज्यानंतर आरोपी संकेत मेंगणे याला तात्काळ अटक करण्यात आली. आता या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पतंगे करत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT