Crime: नवऱ्याला खुंटीला बांधलं अन् बायकोवर तिघांकडून गँगरेप
बिहारमध्ये एका महिलेवर तीन जणांकडून तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
अररिया (बिहार): बिहारच्या (Bihar)अररिया जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे, जिथे तीन तरुणांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी महिलेवर तिच्या पतीसमोरच (Husband) सामूहिक बलात्कार केला. ही घटना शनिवारी (22 जून) रात्रीची असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी महिलेच्या पतीला आधी खुंटीला बांधून मारहाण केली आणि त्याच्यासमोरच सामूहिक बलात्काराची घटना घडवून आणली. (gang rape on woman three men in front of her husband bihar one accused arrested)
ADVERTISEMENT
नवर्याला खुंटीला बांधले
पती-पत्नीचा आरडाओरडा ऐकून घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला तुरुंगातही पाठवण्यात आले. तर दोन आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. आरोपींमध्ये राजा कुसयेत, राजेश पासवान आणि खबदाह पंचायतीचे अजित कुसयेत यांचा समावेश आहे.
महिलेवर सामूहिक बलात्कार
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तिन्ही आरोपींनी महिलेच्या घरात घुसून महिलेचा पती झोपलेला असताना त्याला खुंटीला बांधले आणि नंतर महिलेवर सामूहिक बलात्कार केला. बलात्काराच्या घटनेला विरोध केल्याने पतीलाही मारहाण करण्यात आली. पण, त्यांचा आरडाओरडा होताच शेकडो गावकरी जमा झाले आणि त्यांनी आरोपी राजा पासवानला पकडले आणि नरपतगंज पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. त्यानंतर त्याला अटक करुन त्याची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली.
हे वाचलं का?
त्याचबरोबर अन्य आरोपींच्या अटकेसाठी पोलीस विविध ठिकाणी छापे टाकत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर अररियाचे एसपी अशोक कुमार सिंह यांनी सांगितले की, तीन आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली आहे, तर इतर आरोपींना पकडण्यासाठी छापे टाकले जात आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT