80 वर्षीय आजोबांनी नातवाला संपवलं, 'त्या' मागणीला कंटाळून केली हत्या
गाझियाबादमधील 80 वर्षीय आजोबांनी आपल्या नातवाची हत्या केली आहे. नातू दारुसाठी दररोज त्यांना मारहाण करायचा. याप्रकरणी मृताच्या आजोबा आणि काकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
80 वर्षीय आजोबांनी नातवाला संपवलं
'त्या' मागणीला कंटाळून केली हत्या
Crime News : दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अश्विनी उर्फ आशु हत्याकांडाचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आशुची हत्या दुसऱ्या कोणी नसून त्याच्याच 80 वर्षांच्या आजोबांनी आणि काकाने केली असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून हत्येत वापरलेली काठी, गळा आवळण्यासाठी वापरलेला गमछा आणि एक धारदार शस्त्र जप्त केले आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील ही घटना आहे.
नातू करायचा आजोबांना मारहाण
भीम सिंह यांनी आपल्या जमिनीचा काही भाग नऊ लाख रुपयांना विकला होता. त्यातील सात लाख रुपये कर्जात गेले, तर उर्वरित अडीच लाख रुपये आशुने बळजबरीने घेतले होते. आशु दारूच्या आहारी गेला होता आणि दररोज आजोबांकडे दारूसाठी पैसे मागून त्यांना मारहाण करायचा. त्याच्या या त्रासाला कंटाळून त्याचे आई-वडील आधीच त्याला सोडून भाड्याच्या घरात राहू लागले होते. 10 सप्टेंबर रोजी जेव्हा आजोबांनी पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा आशुने त्यांचा फोन हिसकावून घेतला आणि तो विकून दारू प्यायली. या रोजच्या छळाला कंटाळून आजोबा भीम सिंह यांनी आपला लहान मुलगा राजेश याच्यासोबत मिळून आशुचा काटा काढण्याची योजना आखली.
हे ही वाचा : गुप्तांगाला जखमा..,बारामतीत गरोदर महिलेचा मृतदेह आढळला; सगळा घटनाक्रम मुंबई Takवर
'असा' काढला काटा
घटनेच्या दिवशी म्हणजेच 12 सप्टेंबरच्या रात्री आशु घरी आला आणि त्याने पुन्हा आजोबांकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी भीम सिंह यांनी त्याला पैसे न देता, दारूमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या. ती दारू पिऊन आशु झोपण्यासाठी घराच्या छतावर गेला. आशु गाढ झोपेत असताना भीम सिंह आणि राजेश यांनी तिथे जाऊन गमछाने त्याचा गळा आवळला आणि काठीने मारहाण करून त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर दोघांनी म्हातारपणी पुरावे नष्ट करण्याचा आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात अपयश आल्याने त्यांनी स्वतःच पोलिसांत जाऊन अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा : 10 वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीसोबत 9 जणांकडून लैंगिक अत्याचार, आठ जणांच्या आवळल्या मुसक्या
कसं बाहेर आलं प्रकरण?
पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता आजोबा आणि काकाचा संशयास्पद सहभाग समोर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसून चौकशी केल्यावर दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. आशुच्या रोजच्या मारहाणीला आणि धमक्यांना कंटाळूनच हे पाऊल उचलल्याचे आरोपींनी सांगितले. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत.
