पिंकी आणि पिंटूचे अनैतिक संबंध, फेसबुकवाल्या लव्हस्टोरीचा मर्डरने एन्ड कसा झाला?
ghaziabad pinky murder case : गाझियाबादमध्ये फेसबुकवरून ओळख झालेल्या पिंकीची तिच्या कथित प्रियकराने डोक्यात वीट घालून हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेवेळी प्रियकराचा मित्रही उपस्थित होता. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रियकराने मित्राच्या मदतीने पिंकीला संपवलं
फेसबुकवाल्या लव्हस्टोरीचा भयंकर एन्ड
Crime News : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये फेसबुकच्या माध्यमातून सुरू झालेल्या ओळखीचा शेवट महिलेच्या हत्येने झाला आहे. पिंकी असं हत्या झालेल्या 28 वर्षीय महिलेचं नाव आहे. तिची हत्या तिचा कथित प्रियकर पिंटू याने केल्याचा आरोप आहे. या हत्येमध्ये पिंटूचा मित्र आर्यन याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी पिंटू आणि आर्यन या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. गाझियाबादमधील लोनी बॉर्डर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रापुरी परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली. पिंकीला भेटण्यासाठी खोलीवर बोलावण्यात आलं होतं. तिथे आधीपासूनच पिंटूचा मित्र आर्यन उपस्थित होता. त्यानंतर तिघांनी एकत्र बसून दारू प्यायली. मात्र, काही वेळाने पिंकी आणि पिंटू यांच्यात कोणत्यातरी कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद वाढल्यानंतर पिंटूने विटेने पिंकीच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने पिंकीचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा : चिमुकल्याची हत्या करुन किडनी अन् डोळे काढले, अवयव विकून व्हायचं होतं श्रीमंत, कोण आहे आरोपी?
पिंकी पिंटूला भेटण्यासाठी त्याच्या खोलीवर गेली, तिथेच झाला मर्डर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पिंकी ही मूळची बुलंदशहर जिल्ह्यातील अनूपशहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी होती. ती पती प्रमोद आणि दोन मुलांसह गाझियाबादमधील लोनी येथील इंद्रापुरी क्रमांक दोन परिसरातील नीलम फॅक्टरी रोडवर भाड्याच्या घरात राहत होती. तिचा पती प्रमोद रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सणानिमित्त प्रमोद आपल्या मूळ गावी बुलंदशहर येथे गेला होता. त्यामुळे पिंकी घरी एकटीच होती. याच काळात सोमवारी संध्याकाळी तिची हत्या करण्यात आली. पिंकी आणि पिंटू यांची काही महिन्यांपूर्वी फेसबुक आणि फोनच्या माध्यमातून ओळख झाली होती. या ओळखीचं रूपांतर प्रेमसंबंधात झाल्याची माहितीही समोर आली आहे. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क सुरू होता. सोमवारी पिंकी पिंटूला भेटण्यासाठी त्याच्या खोलीवर गेली होती. मात्र, तिथे तिच्यासोबत नेमकं काय घडलं, याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : दिवाळीच्या बोनसवरुन कामगारांमध्ये वाद, शेवटी एकाची हत्या, 'या' कंपनीत काय घडलं?
दारू प्यायल्यानंतर वाद झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर
दरम्यान, पिंकी आणि पिंटू यांच्यात दारू प्यायल्यानंतर वाद झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. यावेळी पिंटूने खोलीत जवळच असलेली वीट घेतली पिंकीच्या डोक्यात घातली. या हल्ल्यामुळे तिचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी पिंटूचा मित्र आर्यनही खोलीत उपस्थित होता. त्यामुळे या हत्येत त्याची नेमकी भूमिका काय होती, याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. खोलीतून आरडाओरडा ऐकू आल्यानंतर परिसरातील नागरिकांना काहीतरी अनुचित घडल्याचा संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. सोमवारी रात्री 8 वाजून 54 मिनिटांनी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पिंटू आणि त्याचा मित्र आर्यन या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
फेसबुकच्या माध्यमातून झालेली ओळख, त्यातून निर्माण झालेले कथित प्रेमसंबंध आणि त्यानंतर झालेली हत्या यामुळे या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे. पिंकीचा पती प्रमोद हा रोजंदारीवर काम करतो. त्यांना दोन मुलं आहेत. सणानिमित्त तो आपल्या गावी गेल्याने पिंकी गाझियाबादमधील भाड्याच्या घरात राहत होती. सोमवारी पिंटूने तिला भेटण्यासाठी आपल्या खोलीवर बोलावलं होतं. तिथे पिंटूचा मित्र आर्यनही उपस्थित होता. तिघांनी एकत्र दारू प्यायल्यानंतर पिंकी आणि पिंटू यांच्यात वाद झाला आणि त्यातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. हत्येमागील नेमकं कारण आणि आर्यनचा या घटनेतील सहभाग याबाबत पोलीस तपास करत आहेत.
