मित्राच्या बायकोचा शारीरिक संबंधांना नकार, 28 वर्षीय नराधमाने दोन वर्षीय चिमुरडीवर केला अत्याचार

एका 28 वर्षीय नराधमाने मित्राच्या दोन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

28 वर्षीय नराधमाचं भयंकर कृत्यू

point

मित्राच्याच मुलीवर लैंगिक अत्याचार

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीने महिलेच्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी हा महिलेच्या पतीचा मित्र असून, तो वारंवार महिलेकडे अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता. मात्र, महिलेने प्रत्येक वेळी त्याला नकार दिल्याने आरोपीने तिच्यावर सूड उगवण्याचे ठरवले. गुजरातमधील भरुच जिल्ह्यात ही घटना घडली.

'गंभीर परिणाम भोगावे लागतील'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्रकुमार (वय 28) असे आरोपीचे नाव आहे. तो महिलेला वारंवार फोन करून संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. महिलेने त्याच्या मागणीला स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपीने तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली होती. त्यानंतर महिलेवर सूड उगवण्यासाठी त्याने तिच्या दोन वर्षांच्या मुलीला लक्ष्य केले. ही चिमुरडी घराच्या अंगणात खेळत असताना आरोपी तिच्याजवळ गेला आणि चॉकलेटचे आमिष दाखवून तिला स्वतःच्या खोलीत घेऊन गेला.

हे ही वाचा : Weather Report: हिवाळ्यातही उन्हाचा तडाखा? राज्यातील हवामानाचा नवा अंदाज समोर

चिमुरडीवर अत्याचार

त्यानंतर आरोपीने चिमुरडीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेत बालिकेच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत झाली. मुलीवरील अत्याचाराची माहिती मिळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात पॉक्सो (POCSO) कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

हे ही वाचा : मुंबई : 'बॅग भरली होती, उद्या हॉस्टेलला जाणार होता...' पण काळाने घातला घाला; बिल्डरवर गंभीर आरोप

पोलीस कोठडीची मागणी

अटकेनंतर आरोपीला भरुच येथील विशेष पॉक्सो न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या कोठडीची मागणी केली आहे. महिलेने अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिच्या निष्पाप मुलीला लक्ष्य करण्यात आल्याचे प्राथमिक तक्रारीतून समोर आले आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.