खळबळजनक! अंबरनाथमध्ये सापडलं शीर नसलेला मृतदेह, खुल्या मैदानात फक्त होतं धड अन्...

मुंबई तक

अंबरनाथच्या तीन झाडी परिसरात एका अज्ञात व्यक्तीचं शीर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ADVERTISEMENT

अंबरनाथमध्ये सापडलं शीर नसलेला मृतदेह
अंबरनाथमध्ये सापडलं शीर नसलेला मृतदेह
social share
google news

अंबरनाथ: मुंबईनजीकच्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात आज (29 मे) एक अत्यंत भयंकर अशी घटना घडली. येथील तीन झाडी परिसरात सकाळी नालंबी भागात एका अज्ञात इसमाचं शीर छाटलेल्या अवस्थेतेतील मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी आठ वाजेच्या सुमारास दररोजप्रमाणे या परिसरात फिरायला गेलेल्या नागरिकांना हा शीर नसलेला मृतदेह दिसला. ज्यामुळे त्यांच्यामध्ये एकच घबराट पसरली. त्यांनी तात्काळ या घटनेची पोलिसांना माहिती दिली.

हे ही वाचा>> कोयत्याचे 17 वार, सूर्यकांतने तडफडत जीव सोडला, बाप-लेकानं कुणाचंच ऐकलं नाही, वाद नेमका काय?

घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन कल्याण तालुका ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी (DYSP) जगदीश शिंदे आणि कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम हे पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 

चौकटीचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पँट घातलेला तसेच पायात चप्पल असलेला हा पुरूषाचा मृतदेह असल्याची माहिती आहे. मात्र, त्याचं शीर गायब आहे. या अज्ञात व्यक्तीची हत्या अत्यंत निर्घृणपणे करण्यात आली असून त्याचं शीर कापून त्याची विल्हेवाट लावण्यात आली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जाता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp