मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, भोजपुरी अभिनेत्रीला रंगेहाथ अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

high profile sex racket busted in mumbai bhojpuri actress arrested 3 models rescued
high profile sex racket busted in mumbai bhojpuri actress arrested 3 models rescued
social share
google news

मुंबई: मुंबई पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा (Sex Racket) भांडाफोड केला आहे. याप्रकरणी छापा टाकल्यानंतर एका भोजपुरी अभिनेत्रीलाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजपुरी अभिनेत्री एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये दलाल म्हणून काम करत होती. (high profile sex racket busted in mumbai bhojpuri actress arrested 3 models rescued)

ADVERTISEMENT

मुंबई पोलिसांच्या सोशल सर्व्हिस शाखेने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आरे कॉलनी परिसरातील रॉयल पाम हॉटेलमध्ये सेक्स रॅकेटची माहिती मिळाली होती. पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला भोजपुरी अभिनेत्रीकडे पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्या अभिनेत्रीने त्या बनावट ग्राहकाशी करार केला, ज्यामध्ये प्रत्येक मॉडेलसाठी 50 ते 80 हजार रुपये मागितले होते.

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला

अभिनेत्रीने बनावट पोलीस ग्राहकाला आरे कॉलनीतील रॉयल पाम हॉटेलमध्ये पाठवले. येथे मॉडेल्स आधीच उपस्थित होत्या. यावेळी पोलिसांनी आरोपी अभिनेत्रीला घटनास्थळी पैसे घेताना रंगेहाथ अटक केली. तसेच त्यानंतर हॉटेलमधून 3 मॉडेल्सचीही सुटका करण्यात आली.

हे वाचलं का?

हे देखील वाचा>> अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडणारा शुटर अरुण उर्फ कालिया कोण आहे?

मॉडेल कशा अडकल्या होत्या सेक्स रॅकेटमध्ये?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजपुरी अभिनेत्री ही वेगवेगळ्या ग्राहकांना मॉडेल्स पुरवत असे. चित्रपटात करिअर करण्यासाठी ज्या मॉडेल्स मुंबईत आल्या होत्या, त्या सध्या संघर्षाच्या काळातून जात असलेल्या त्या मॉडेल्सना पैशांची गरज होती. अशाच मॉडेल्सना हेरून भोजपुरी अभिनेत्री त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असे.

अनेक भोजपुरी चित्रपटात काम

एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये दलाल म्हणून काम करणाऱ्या अभिनेत्रीने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. लैला मजनू व्यतिरिक्त तिने बाप नंबरी बेटा दस नंबरी सारखे भोजपुरी कॉमेडी शो केले आहेत. याशिवाय अभिनेत्रीने बूम ओटीटी वाहिनीवरही काम केले आहे.

ADVERTISEMENT

हे देखील वाचा>> Satara Crime: सोशल मीडियावर ओळख अन् शाळेतील मुलीवर लॉजवर लैंगिक अत्याचार

आरोपी सहा वर्षांपासून मुंबईत

मुंबई पोलिसांच्या सोशल सर्व्हिस ब्राँचने अभिनेत्रीला अटक केली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, भोजपुरी अभिनेत्री ही 6 वर्षांपासून मुंबईत राहत होती, मात्र ती कधीपासून या सेक्स रॅकेटचा व्यवसाय करत होती का त्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT