महाराष्ट्रात ऑनर किलिंग! 16 वर्षाच्या लेकीची कोयत्याने हत्या, मृतदेह जाळला; कारण…
नांदेडमध्ये ऑनर किलिंग : नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात एका 16 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली. वडिलांनी मुलीला प्रेमप्रकरणातून कोयत्याने वार करून संपवले.
ADVERTISEMENT

-कुवरचंद मंडले, नांदेड
Honour Killing in Nanded : पुरोगामी महाराष्ट्र हादरवून टाकणारी घटना नांदेड जिल्ह्यात घडली. मुखेड तालुक्यातील कृष्णावाडीजवळील मनुतांडा येथे एका बापाने पोटच्या लेकीचा कोयत्याने वार करत जीव घेतला. कुणाला शंका येऊ नये म्हणून आईवडिलांनी लागलीच मृतदेह जाळून टाकला. मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव आईवडिलांनी रचला, पण गावातील लोकांना संशय आल्याने प्रकरण पोलिसांत गेले. तपासानंतर जे समोर आले, त्याने अवघ्या गावाला धक्का बसला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली.
मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मुकराबाद पोलिसांना एका व्यक्तीने दिली. हत्या करण्यात आलेल्या मुलीचे नाव शामका अण्णाराव राठोड असे आहे. ती अवघी 16 वर्षांची होती. तिची वडील अण्णाराव गोविंद राठोड याने 2 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता रागाच्या भरात कोयत्याने मारून निर्घृण हत्या केली.
मुलीने आत्महत्या केल्याचा बनाव
आरोपी अण्णाराव राठोडने नातेवाईकांना सांगितले की मानसिक दबावामुळे शामकाने गळफास घेतला. हे गाव मुकरमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. मात्र, पोलिसांपर्यंत या घटनेची माहिती गेली आणि शेवटी अण्णाराव राठोडच्या हातात बेड्या पडल्या.