लग्नाला झाले होते फक्त 10 महिने, नवऱ्याने शेजाऱ्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले, यानंतर 19 वर्षीय विवाहितेचं काय झालं?

मुंबई तक

दोघांचा संसार इतक्या लवकर संपले असं कुणाच्याही ध्यानी-मनी नव्हतं. मात्र एका भयानक प्रसंगानंतर तिनं टोकाचं पाऊल उचललं. 19 व्या वर्षीच ती आपल्या आयुष्याला का त्रासली, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाला झाले होते फक्त 10 महिने,

point

नवऱ्याने शेजाऱ्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले

point

यानंतर 19 वर्षीय विवाहितेचं काय झालं?

Crime News : प्रियकराने लग्नासाठी नकार दिल्याने एका 19 वर्षीय विवाहितेने आपले आयुष्य संपवले आहे. बिहारच्या बांका परिसरातील ही घटना आहे. लाडो खातून असं मृत महिलेचं नाव असून 10 महिन्यांपूर्वी तिचा मोहम्मद हासिबसोबत विवाह झाला होता. दोघांचा संसार इतक्या लवकर संपले असं कुणाच्याही ध्यानी-मनी नव्हतं. मात्र एका भयानक प्रसंगानंतर तिनं टोकाचं पाऊल उचललं. 19 व्या वर्षीच ती आपल्या आयुष्याला का त्रासली, जाणून घेऊया.

शेजारी राहणाऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध

सुरुवातीचे काही महिने सुखाचे गेल्यानंतर, लग्नाच्या पाचव्या महिन्यात लाडोचे शेजारी राहणाऱ्या गुफरान नावाच्या तरुणावर प्रेम जडले. नवऱ्याच्या माघारी या दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते. आत्महत्येच्या 10 दिवसांपूर्वी लाडो आपल्या नवऱ्यासोबत माहेरी आली होती. बुधवारी (9 एप्रिल) नवरा हासिब बाजारात गेला असताना, संधी साधून गुफरान तिला भेटायला घरी आला. मात्र, हासिब अचानक घरी परतल्याने त्याने दोघांनाही आक्षेपार्ह परिस्थितीत पाहिले. यावर हासिबने जाब विचारला असता, गुफरानने आपल्या साथीदारांना बोलावून हासिबला बेदम मारहाण केली.

हे ही वाचा : 22 वर्षाचा बॉयफ्रेंड आणि 35 वर्षीय महिला, पाहा बेडमध्ये सापडलं तरी काय?

प्रियकराने स्वीकार करण्यास नकार दिला

या वादानंतर प्रकरण मिटवण्यासाठी गावात पंचायत बोलावण्यात आली. सायंकाळपर्यंत चाललेल्या या पंचायतीत जेव्हा गुफरानसमोर लाडोचा स्वीकार करण्याचा किंवा तिच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला गेला, तेव्हा त्याने सर्वांसमोर स्पष्ट नकार दिला. ज्या प्रियकरासाठी तिने नवऱ्याचा विश्वास तोडला, त्यानेच ऐनवेळी हात झटकल्याने आणि समाजात मानहानी झाल्याने लाडो मानसिकरीत्या पूर्णपणे खचून गेली. भविष्यातील अंधकार आणि झालेला अपमान सहन न झाल्याने तिने रात्री उशिरा विषारी औषध घेतले.

हे ही वाचा : रिक्षा चालकावर जीव जडला, पत्नीने भयंकर कट रचला, बँक अधिकारी असलेल्या पतीला संपवलं

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने भागलपूरच्या मायागंज रुग्णालयात दाखल केले, मात्र गुरुवारी (10 एप्रिल) सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला असून, आरोपी गुफरान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
 

हे वाचलं का?