22 वर्षाचा बॉयफ्रेंड आणि 35 वर्षीय महिला, पाहा बेडमध्ये सापडलं तरी काय?
Woman Murder Case: दिल्लीच्या मंगोलपुरी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे एका पीजी रूममध्ये 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
ADVERTISEMENT

दिल्ली: दिल्लीच्या मंगोलपुरीमध्ये एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचे हातपाय बांधले आणि ब्लँकेटने तोंड बांधून नंतर तिचा गळा दाबून खून केला. ज्यानंतर आरोपी तरुणाने महिलेचा मृतदेह एका बेड बॉक्समध्ये कोंबला. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात 22 वर्षीय प्रियकर आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
7 एप्रिल रोजी मंगोलपुरी पोलीस ठाण्यात एक पीसीआर कॉल आला. माहिती मिळताच, पोलिसांचं एक पथक तात्काळ पत्थर मार्केटमधील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचले, जिथे अमरजीत नावाचा एक व्यक्ती पीजी चालवत होता.
जेव्हा एका खोलीतील डबल बेड बॉक्स उघडण्यात आला, तेव्हा पोलीस थक्क झाले. कारण आतमध्ये एका महिलेचा मृतदेह कोंबलेला होता. महिलेच्या कपाळावर जखमा आढळल्या, तिचे हात आणि पाय बांधलेले होते आणि तिच्या मानेवरही व्रण आढळले.
तपासात मृत महिलेच्या कपाळावर गळा आवळल्याच्या खुणा आणि एक खोल जखम असल्याचे उघड झाले. तिचे हात आणि पायही बांधलेले आढळले.









