Crime : भाडेकरूचा मालकीणीवर जडला जीव, तिसऱ्याची एन्ट्री होताच घडलं भयानक हत्याकांड

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

immoral relations tenant killed women owner love affair delhi crime news
immoral relations tenant killed women owner love affair delhi crime news
social share
google news

Delhi Crime News : देशात गुन्ह्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या आहेत. असे असताना एखादा भाडेकरू ठेवणे खूपच जोखमीचे झाले आहे.कारण दररोज भाडेकरूने अथवा भाड्याच्या घऱात हत्येच्या घटना घडत वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका 31 वर्षीय भाडेकरूने त्याच्या 60 वर्षीय घऱ मालकीणीची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने सध्या एकच खळबळ माजली आहे.दरम्यान या घटनेत भाडेकरूने मालकीणीची हत्या का केली हे जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

दिल्लीत ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील 31 वर्षीय आरोपी देवेंद्र हा कामाच्या शोधात अलीगढवरून दिल्ली आला होता. यावेळी तांब्याची तार पॅकिंग करण्याचा तो व्यवसाय करायचा. त्यानंतर कोविड महामारीत त्याचे खुप मोठं नुकसान झालं. व्यवसाय ठप्प झाला.साधारण 2 वर्ष त्याच्याकडे कोणताच रोजगार नव्हता. त्यामुळे वडिलांकडून पैसै मागवून तो कसाबसा राहत होता.

हे ही वाचा : ‘चहा प्यायला रूपया नाही’, संसदेतील हल्ल्यानंतर अमोल शिंदेच्या कुटुंबियांची कशी आहे अवस्था?

या दरम्यान 2019 साली देवेंद्र 60 वर्षीय आशादेवी यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहायला आला. यावेळी देवेंद्र आणि आशादेवी यांची चांगली मैत्री झाली. या मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले आणि दोघांच्या अनैतिक संबंधांना सुरुवात झाली. हे संबंध सुरू असतानाच दोघांमध्ये एका तिसऱ्याची एन्ट्री झाली. खरं तर आशा देवी यांच्या घरात एक भाडेकरू महिला राहायची. या महिलेसोबत देवेंद्रचे नातं सुरू झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 4 डिसेंबरला दोघांनी लग्नगाठ बांधली.

हे वाचलं का?

या लग्नाची माहिती आशादेवी यांना मिळताच त्यांना खूप राग आला. त्यांनी तत्काळ देवेंद्रला फोन करून घरी बोलावून घेतले. त्यानंतर 1O डिसेंबरला देवेंद्र आशादेवीच्या घरी पोहोचला. यावेळी आशादेवीने देवेंद्रच्या लग्नास विरोध दर्शवला. या विरोधामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला. या वादातून आशादेवीने देवेंद्रच्या कानाखालीच मारली. या घटनेमुळे रागावलेल्या देवेंद्रने आशादेवीच्या डोक्यात विट मारली. त्यानंतर तिचा जीव जाईपर्यंत तो डोक्यात वीट मारतच राहिला. त्यानंतर देवेंद्रने तिचा गळा घोटण्याचा देखील प्रयत्न केला. या हत्येनंतर देवेंद्रने आशादेवीचा मृतदेह तिच्या बेडरूममधील पलंगात लपवून ठेवला होता. यानंतर देवेंद्रने आशादेवीच्या घरातील 13 हजार रूपये रोख रक्कम आणि दागदागिने घेऊन तो पसार झाला.

हे ही वाचा : IND vs SA : टीम इंडियाला मोठा झटका, आफ्रिकेविरूद्ध ‘हे’ खेळाडू संघातून आऊट

स्थानिकांना आशादेवीच्या घरातून दुर्गंधी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात आता पोलिसांना आरोपी देवेद्रला उत्तरप्रदेशच्या अलिगढमधून अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT