Jaipur-Mumbai train : धावत्या रेल्वे गाडीत गोळीबार, चौघांचा मृत्यू; काय घडलं?
जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वे गाडीत रेल्वे जवानानेच गोळीबार केला. या गोळीबारात रेल्वे पोलीस दलाच्या एका अधिकाऱ्यासह चौघांचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
Railway Protection Force jawan opens fire In train : वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच जयपूर-मुंबई पॅसेंजर रेल्वे गाडीत अंदाधूंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. रेल्वे पोलीस दलाच्या जवानानेच हा गोळीबार केला असून, यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन प्रवासी असून, एक रेल्वे पोलीस दलाचा अधिकारी आहे.
ADVERTISEMENT
मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात ही घटना घडली. जयपूरवरून मुंबईकडे येणाऱ्या पॅसेंजर रेल्वेत गाडीत सुरक्षा जवानानेच अंदाधुंद गोळीबार केला. चेतन असं गोळीबार करणाऱ्या जवानाचं नाव असून, तो कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहे. गोळीबार करण्यात आला, तेव्हा रेल्वे गाडी वापी ते बोरिवली स्टेशनच्या दरम्यान होती.
जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार, नेमकं काय घडलं?
सोमवारी (31 जुलै) जयपूर एक्स्प्रेस मुंबईकडे (ट्रेन नंबर 12956) येत होती. याच दरम्यान, बोगी क्रमांक बी 5 मध्ये पहाटे 5.23 वाजता ही घटना घडली. गोळीबार करणारा आरपीएफ जवान चेतन आणि एएसआय अधिकारी हे गाडीतून प्रवास करत होते. त्याचवेळी चेतनने एएसआयवर गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबाराने प्रवाशी घाबरले.
हे वाचलं का?
वाचा >> बायकोची हत्या, मेहुणीसोबत गाठला क्रूरतेचा कळस! सायको किलरने पोलिसांनाही फोडला घाम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 31 जुलै रोजी पहाटे 5 वाजून 23 मिनिटांनी जयपूर एक्स्प्रेसमध्ये गोळीबार झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. बोगी क्रमांक 5 मध्ये ही घटना घडली. कर्तव्यावर असलेल्या चेतनने प्रभारी एएसआय टीका राम यांच्यावर गोळी झाडली.
वाचा >> Pune Acp गायकवाडांचं रक्त का खवळलं, पत्नीसोबत पुतण्याच्या हत्येची Inside Story
गाडी बोरिवली रेल्वे स्टेशनवर पोहोचली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबारात एएसआय टीका राम आणि तीन रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बोगीची पाहणी केली. दरम्यान, गोळीबार करणारा आरोपी चेतनला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT