लग्नाचा तिसरा वाढदिवस पण रोशनीचं भयंकर पाऊल, बाळाला दुसऱ्या मजल्यावरुन...

मुंबई तक

Kanpur Crime News : कानपूरमध्ये लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवशी कौटुंबिक वादानंतर 20 वर्षीय रोशनीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. तिच्या 14 महिन्यांच्या मुलीचा जीव वाचला, मात्र उपचारादरम्यान रोशनीचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

Kanpur Crime News
Kanpur Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लग्नाचा तिसरा वाढदिवस पण रोशनीचं भयंकर पाऊल,

point

बाळाला दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकलं

Kanpur Crime News :  कानपूरमध्ये कौटुंबिक वादातून 20 वर्षीय महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्याआधी तिने आपल्या 14 महिन्यांच्या मुलीला इमारतीवरून खाली फेकले. या घटनेत मुलगी बचावली असून, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवशी एका 20 वर्षीय विवाहितेने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपले जीवन संपवले. रोशनी असे या महिलेचे नाव असून, 11 ऑक्टोबर रोजी उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. 

हेही वाचा : वर्गमैत्रिणीच्या घरी गेला अन् गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, दहावीच्या विद्यार्थ्यासोबत काय घडलं?

या घटनेत तिची 14 महिन्यांची मुलगीही दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकली गेली होती. मात्र, मुलीचे वडील नूर आलम यांनी तिला पकडल्याने ती गंभीर दुखापतीतून बचावली. सध्या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवस, पण रोशनीची आत्महत्या 

रोशनीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबरच्या रात्री रोशनी आणि नूर आलम यांनी त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला होता. या वेळी दोघांनी केक कापला आणि एकत्र जेवणही केले. मात्र, त्याच रात्री नूर आलम आणि रोशनीची बहीण इशरत यांच्यात वाद झाला. त्यानंतर इशरत घर सोडून जाण्याचा प्रयत्न करत होती. रोशनीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र इशरतने थांबण्यास नकार दिला. या घटनेनंतर घरात नेमके काय घडले, याबाबतची सर्व माहिती अद्याप समोर आलेली नाही.